Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चिपळूणमध्ये एटीएसची धाड, पाकिस्तान कनेक्शन प्रकरणात एकाला उचलल

चिपळूणमध्ये एटीएसची धाड, पाकिस्तान कनेक्शन प्रकरणात एकाला उचलल

रत्नागिरी : खरा पंचनामा 

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मराठवाड्यात जवळपास 150 ठिकाणी छापेमारी करत मोठी कारवाई केली होती. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाच वेळी कारवाई करत मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स, आर्थिक व्यवहार आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी करण्यात आली होती. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातील 6 जणांना ताब्यात घेतले होते. या कारवाईमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.

आता अशीच छापेमारी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूनमध्ये करण्यात आली आहे. एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. संशयास्पद हालचाली आणि सोशल मीडियाद्वारे दहशतवादी घटकांशी संपर्क असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. तर हा व्यक्तीचे पाकिस्तानस्थित दहशतवादी आणि गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने चिपळूणमध्ये कारवाई करून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित कथित डिजिटल संपर्काच्या तपासाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. संशयित तरुण काही दिवसांपासून चिपळूणमध्ये राहत असल्याचे कारवाईनंतर समोर आले आहे.

तर पाकिस्तानस्थित कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्क असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी राज्यभर १५० ठिकाणी शोधमोहीम राबवली. त्यांच्याकडून तपासातून मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे एटीएसचे पथक शुक्रवारी रात्री चिपळूणपर्यंत पोहोचले.

उपनगरातून एका संशयिताला रात्री ताब्यात घेतेले. त्याच्या सोशल मीडिया अकाउंट आणि डिजिटल व्यवहाराची चौकशीसाठी त्याला नवी मुंबईला नेले आहे. तर दहशतवादविरोधी पथकाने चिपळूणमध्ये ताब्यात घेतलेल्याचे नाव आणि चौकशीची माहिती गुप्त ठेवण्याची सूचना वरिष्ठांनी केली आहे.

एटीएसने राज्यभर १५० ठिकाणी छापे टाकून कारवाई केली, त्याचाच हा एक भाग आहे. पुढील चार दिवसांनंतर आणखी चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विनय नरवणे यांनी दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.