Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हाफकिनचे खासगीकरण नाही, आधुनिकीकरणासाठी २५ कोटींचा निधी देणारमंत्री झिरवळ यांची भूमिका

हाफकिनचे खासगीकरण नाही, आधुनिकीकरणासाठी २५ कोटींचा निधी देणार
मंत्री झिरवळ यांची भूमिका

मुंबई : खरा पंचनामा 

हाफकिन संस्थेत होणाऱ्या लसनिर्मितीसाठी रिलायन्ससोबत भागीदारीचा कोणताही करार करण्यात आला नाही. असा कोणताही करार आताही अस्तित्वात नसून येथील प्रयोगशाळेच्या अद्ययावतीकरणासाठी २५ कोटींचा निधी तत्काळ देण्यात येतील. संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन व्यापक कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिले.

हाफकीन जीव-औषध महामंडळ ही देशातील लस उत्पादक संस्थांपैकी एक महत्त्वाची संस्था असून १५० वर्षांचा वैभवशाली इतिहास आहे. अशा संस्थेचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून रिलायन्स लाइफ रायन्सेससोबत भागीदारी केली जात असल्याबाबत काँग्रेसचे भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी महामंडळाकडून संयुक्त भागीदारीसंदर्भात जाहिरात देण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेला संघटनांनी विरोध करीत आंदोलन केले. या भागीदारी प्रस्तावासाठी रिलायन्स लाइफ सायन्सेस या एकमेव कंपनीकडून स्वारस्य दर्शविण्यात आले होते, तरीही विरोधानंतर हा स्वारस्य प्रस्ताव मान्य करण्यात आला नाही.

सध्या कोणताही कराही अस्तित्वात नसल्याचे सांगताना हाफकीनकडून आधुनिकीकरणासाठी ११०० कोटींची मागणी करण्यात आली आहे. यापैकी ३५ कोटींचा निधी मंजूर झाला असून आणखी ३० कोटींची मागणी प्रलंबित आहे. त्यापैकी २५ कोटींचा निधी तत्काळ वर्ग करून आधुनिकीकरणाची कामे सुरू करण्यात येतील असे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले. त्याचप्रमाणे लस उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला होणार लाभ, केंद्र सरकारच्या योजनांतून आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.

त्याचप्रमाणे २५६ कोटींची लस पुरवठ्याची मागणी हाफकिनकडे प्रलंबित असून तातडीने ५० कोटी देण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या पुनरुज्जीवनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिली. त्यानुसार हाफकिनचे आधुनिकीकरण, प्रलंबित निधी, उत्पादन क्षमता वाढ, कर्मचारी प्रश्न आणि उस उत्पादनाशी संबंधित अडचणी या सर्व विषयांवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे अश्वासन झिरवाळ यांनी दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.