Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नृसिंहवाडीत ‘दक्षिणद्वार सोहळ्याची’ उत्कंठा वाढली

नृसिंहवाडीत ‘दक्षिणद्वार सोहळ्याची’ उत्कंठा वाढली

पूजा फडके 
कोल्हापूर : खरा पंचनामा 

शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिराच्या परिसरात कृष्णेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. पुराचे पाणी आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले असून, कधीही मंदिरात पाणी शिरण्याची शक्यता आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीचे पाणी मंदिराच्या दक्षिण दरवाजातून आत प्रवेश करेल. जेव्हा हे पाणी श्रींच्या चरणांना स्पर्श करते, तेव्हा त्याला ‘दक्षिणद्वार सोहळा’ म्हटले जाते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांमध्ये मोठी उत्कंठा असून, मंदिर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.