Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठी घडामोडसुनेत्रा पवारांना दिलेलं राष्ट्रवादीच्या नेत्याचं पत्र लीक

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठी घडामोड
सुनेत्रा पवारांना दिलेलं राष्ट्रवादीच्या नेत्याचं पत्र लीक

मुंबई : खरा पंचनामा 

केंद्रात आणि राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदल, विस्ताराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. मंत्रिमंडळातील संभाव्य बदलाच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी महायुतीमधील पक्षांत आता मंत्रिपदासाठीची लॉबिंग सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केंद्रात कोणाला संधी मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना शिफारस करणारे पत्र समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाने एनडीएमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना केंद्रात कोणतंही स्थान मिळाले नाही. आता, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची संधी आहे. त्यामुळे आता दिल्लीतील घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोटातून एक मोठी मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी थेट सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून, पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी शिफारस करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

उदयकुमार आहेर यांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः पुढाकार घ्यावा. केंद्रातील सर्वोच्च नेतृत्व म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पार्थ पवार यांच्या नावासाठी आग्रही शिफारस करण्यात यावी, अशी थेट मागणी आहेर यांनी या पत्राद्वारे केली आहे.

उदयकुमार आहेर यांनी पार्थ पवार यांच्यासाठी मंत्रिपदाची मागणी करताना आठ कारणे दिली आहेत. या पत्रात, २१ व्या शतकातील तरुणांचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल. त्यामुळे देशभरातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट होण्यास मदत होणार असल्याचे म्हटले. पार्थदादा हे खऱ्या अर्थाने २१ व्या शतकातील उमद्या तरुणांचे व्हिजनरि नेतृत्व आहे. हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. याचा उपयोग देशपातळीवर निश्चितपणाने सरकारला व पक्ष वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल, असा मुद्दा पत्रात मांडण्यात आला आहे.

पार्थदादा हे राजकीय दृष्ट्या पक्षाला किंवा जनतेला न्याय देऊ शकणार नाहीत असा भ्रम दुर्दैवाने आपल्यातीलच काही लोकांकडून पसरविला जात आहे. हे "ओपन सिक्रेट" आहे. एखाद्या बाबत गैरसमज पसरवून त्याचे करिअर संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.