Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ड्रग्ज प्रकरणात मराठी येत नाही म्हणून हायकोर्टानं दिला जामीन !

ड्रग्ज प्रकरणात मराठी येत नाही म्हणून हायकोर्टानं दिला जामीन !

नागपूर : खरा पंचनामा 

ड्रग्स प्रकरणातील ओडिसाच्या एका आरोपीला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना जे कारण दिलं त्याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. या जामिनामागील कारण खूपच वेगळं आणि गंमतीशीर आहे.

या आरोपीला स्थानिक भाषा म्हणजेच मराठी अजिबात समजत नव्हती. भाषाच समजत नसल्याने त्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य ती कायदेशीर मदत मिळवता आली नाही. कोर्टाने यावर स्पष्ट सांगितलं की, कायद्याच्या किचकट तांत्रिक नियमांपेक्षा संविधानाने माणसाला दिलेले हक्क जास्त महत्त्वाचा आहे.

संविधानाने देशातील प्रत्येक आरोपीला आपली बाजू मांडण्याचा आणि आपल्यावर नेमके काय आरोप झालेत, हे नीट समजून घेण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे. या आरोपीला मराठी येत नसल्याने त्याच्या या हक्काचा संकोच होत होता, हे लक्षात घेऊन कोर्टाने त्याला जामीन दिला.

याच कोर्टात यापूर्वी असाच एक गंमतीशीर प्रसंग घडला होता. हत्येच्या एका गुन्ह्यातील आरोपीने देखील मला मराठी येत नाही असा बहाणा करत जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिथे पोलिसांनी भलतीच हुशारी दाखवली. पोलिसांनी थेट त्या आरोपीची १० वीची मार्कशीटच कोर्टासमोर आणून ठेवली. पोलिसांनी सादर केलेला पुरावा कोर्टानं पाहिला आणि त्यात जे सापडलं त्यामुळे सगळेच चक्रावले.

जो आरोपी मला मराठी येत नाही हे वारंवार कोर्टात सांगत होता त्याला चक्क मराठी विषयात अव्वल गुण मिळाले होते. आरोपीचा हा खोटारडेपणा उघड होताच कोर्टाने त्याचा जामीन अर्ज त्याच सेकंदाला फेटाळून लावला. ज्याला खरोखरच भाषा येत नव्हती त्याला कोर्टाने दिलासा दिला. कोर्टाच्या या निर्णयामुळे त्याची चर्चा सगळीकडे होते आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.