Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली शहरात १०९ वाहन चालकांवर कारवाईचा बडगाकर्मवीर चौकात वाहतूक शाखेची धडक कारवाई

सांगली शहरात १०९ वाहन चालकांवर कारवाईचा बडगा
कर्मवीर चौकात वाहतूक शाखेची धडक कारवाई

सांगली : खरा पंचनामा 

येथील कर्मवीर चौकात नाकाबंदी करत वाहतूक शाखेने आज धडक कारवाई केली. सुमारे १०९ वाहन चालकांवर कारवाई करत ७६ हजारांचा दंड वसूल केला. ही मोहीम आता आणखी व्यापक करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे नुतन निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.
शहरातील बेदरकार वाहतूकीसह मॉडिफाईड सायलेन्सरवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले होते. त्यानुसार निरीक्षक सिंदकर यांनी आजपासून कारवाईचा धडाका सुरू केला. येथील कर्मवीर चौकात सायंकाळी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. निरीक्षक सिंदकर यांच्यासह तीन अधिकारी आणि २४ अंमलदार यांनी नाकाबंदी केली. प्रत्येक वाहनांची तपासणी यावेळी करण्यात आली.

फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या ३२ वाहनांवर कारवाई करत २३ हजारांचा दंड वसुली केला. तसेच ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या १५ जणांकडून पंधरा हजार, परवनाना नसणाऱ्या ५१ जणांकडून ३२ हजार, मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या दोघांकडून दोन हजार, मॉडिफाईड सायलन्सर लावणाऱ्या तिघांकडून तीन हजार, तर ब्लॅक फिल्मिंग असणाऱ्या दोन वाहन चालकांकडून दोन हजार असा ७६ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. 

शहरातील बेदरकार वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी पुढील टप्प्यात हीच मोहीम आणखी व्यापक केली जाणार आहे. प्रत्येक प्रमुख चौकात ही मोहीम होणार आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन निरीक्षक सिंदकर यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.