फडणविसांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांनाही टाकलं मागे!
मुंबई : खरा पंचनामा
मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकले आहे. आता राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत फडणवीस यांनी तिसरे स्थान पटकावले आहे.
12 जुलै 2026 या तारखेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ 2,430 दिवसांचा (सुमारे 6 वर्ष 7 महिने) झाला आहे. याच कालावधीसह फडणवीस यांनी शरद पवार यांच्या 2,412 दिवसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाला मागे टाकलं आहे. फडणवीस यांचा सध्याचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सुरू असल्याने त्यांच्या नावावरील हा विक्रम वाढत जाणार आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कालावधीच्या यादीत दिवंगत वसंतराव नाईक हे ४,०९६ दिवसांसह (११ वर्षे ७८ दिवस) अव्वल स्थानावर आहेत. त्यांच्या पाठोपाठ २,६८६ दिवसांसह (सुमारे ७वर्षे १२९ दिवस) विलासराव देशमुख दुसऱ्या स्थानावर आहेत. आता २,४३० दिवसांच्या (सुमारे ६ वर्षे ७ महिने) कार्यकाळासह देवेंद्र फडणवीस तिसऱ्या स्थानावर पोहोचले असून शरद पवार २,४१२ दिवसांसह (सुमारे ६ वर्षे २२१ दिवस) चौथ्या स्थानावर गेले आहेत.
विशेष म्हणजे शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना एकदाही सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यांच्या चारही कार्यकाळांचा शेवट विविध कारणांमुळे मुदतपूर्व झाला होता.
देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. पाच वर्षांचा होता. 2019 साली त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र तो कार्यकाळ अवघ्या 6 दिवसांत संपुष्टात आला. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, जे काल 12 जुलै 2026 पर्यंत या तिसऱ्या कार्यकाळाला 585 दिवस पूर्ण झाले. सध्या हा कार्यकाळ अद्याप सुरू आहे. आगामी काळात ही नोंद आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.