Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'अक्का, जास्त लोड घेऊन नका, या मुलांच्या नादी तर.'निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यावर रोहिणी खडसेंची झोंबणारी टीका

'अक्का, जास्त लोड घेऊन नका, या मुलांच्या नादी तर.'
निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यावर रोहिणी खडसेंची झोंबणारी टीका

मुंबई : खरा पंचनामा 

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे. विद्यार्थ्यांचे दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे राजकारण देखील तापलं आहे. अशातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक अजब विधान केले आहे. या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केला जात आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणावर भाष्य करताना निर्मला सीतारमण यांनी "पेपरफुटीमुळे सुरुवातीला अनेक विद्यार्थ्यांना धक्का बसला मात्र त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेत आपली कामगिरी सुधारली." असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्याने बोचरी टीका केली आहे.

अक्का, जास्त लोड घेऊन नका, या मुलांच्या नादी तर अजिबात लागू नका कारण हे धर्मेंद्र प्रधान सोडतील आणि तुमच्याच राजीनाम्याची मागणी करतील ! अशा शब्दांत अॅड रोहिणी खडसे यांनी निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

“अनेक तरुण स्वतः सांगत आहेत की, सुरुवातीला पेपरफुटीमुळे त्यांना खूप त्रास झाला. मात्र नंतर त्यांनी या परिस्थितीचा सामना करत अधिक मेहनत घेतली आणि त्यांची कामगिरी सुधारली. अनेक विद्यार्थ्यांनी या आव्हानाचा स्वीकार करून यश मिळवले आहे. त्याचबरोबर सरकारही या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करत आहे आणि पंतप्रधान स्वतः या विषयावर लक्ष ठेवून आहेत. सरकारने वेळेत पावले उचलल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले. जर सरकारने योग्य वेळी कारवाई केली नसती, आरोपींना अटक झाली नसती." असे त्यांनी म्हटलं आहे.

रोहिणी खडसे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हाच व्हिडिओ एक्सवरुन शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे. पोस्टमध्ये त्या म्हणाल्या "रुपया कमजोर नाही, डॉलर मजबूत होत आहे" च्या घवघवीत यशानंतर सर्वश्रेष्ठ अर्थमंत्री निर्मलाअक्का घेऊन आल्या आहेत "पेपर फुटला ते चांगलं झालं, विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करण्याचा वेळ मिळाला"

अंधेर नगरी चौपट राजा! असा सगळा कारभार आहे. माझा निर्मलाअक्कांना एक सल्ला आहे. अर्थात सल्ला देण्याइतकी मी मोठी नाही पण तरी... अक्का, जास्त लोड घेऊन नका, या मुलांच्या नादी तर अजिबात लागू नका कारण हे धर्मेंद्र प्रधान सोडतील आणि तुमच्याच राजीनाम्याची मागणी करतील ! असे सोशल मीडिया पोस्टमध्ये रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.

निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यावर उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं. 'निर्मला सितारमन या मूर्ख बाई आहेत. त्यांना देशाविषयी काय माहीत आहे. त्यांच्या देशाविषयी भावना काय आहेत? त्यांना काय कळतं? आम्ही त्यांच्या नवऱ्याशी बोलू. ते शहाणे आहेत'. असे राऊत म्हणाले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.