Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सांगली, ईश्वरपुरात मोर्चा

दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सांगली, ईश्वरपुरात मोर्चा

सांगली : खरा पंचनामा 

'नीट' पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन करणाऱ्या  विद्यार्थ्यांवर दिल्लीत  झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला.  विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघाला. तसेच ईश्वरपूर येथे विद्यार्थ्यांनी विराट निषेध मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. 

हातात तिरंगा, महापुरुषांची छायाचित्रे आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलन शांततेत पार पडले असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, यांनी राजीनामा दिला पाहिजे तसेच संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यामुळे त्याचा निषेध नोंदविण्यासाठी सांगलीकर विद्यार्थी-'स्टुडंटस् युनायटेड फॉर जस्टीस' या बॅनरखाली पक्षविरहित मोर्चामध्ये तरुण तरुणी  विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . दर्जेदार शिक्षण ही सरकारचीं जबाबदारी आहे, परंतु नीट परीक्षा पेपरफुटीमुळे पारदर्शकता आणण्यात विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, यांनी राजीनामा दिला पाहिजे, तसेच संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यामुळे त्याचा निषेध  नोंदविण्यासाठी या पक्षविरहित मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.