Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

१५ गुन्ह्यांतील १ लाख २४ हजारांची दारू नष्टसांगलीत विश्रामबाग पोलिसांची कारवाई

१५ गुन्ह्यांतील १ लाख २४ हजारांची दारू नष्ट
सांगलीत विश्रामबाग पोलिसांची कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या १५ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला एकूण १,२४,३३० रुपये किमतीचा बेकायदेशीर दारूचा मुद्देमाल पोलिसांकडून न्यायालयाच्या व राज्य उत्पादन शुल्काच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई १६ जुलै रोजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून करण्यात आली.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५ (ई)(ड) नुसार दाखल असलेल्या एकूण १५ गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला वारस प्रोव्हीजन दारूचा साठा नष्ट करण्याचे आदेश सांगली येथील न्यायालय आणि अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सांगली यांच्याकडून प्राप्त झाले होते.

या आदेशांनुसार, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अंमलदार अतुल खंडागळे, विक्रांत घेरडे, विजय पाटील आणि सचिन घोडे यांनी योग्य पाठपुरावा केला. त्यानंतर १६ जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क मिरजचे पोलीस निरीक्षक श्री. सुपे आणि दोन पंचांच्या समक्ष हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

पोलीस अधीक्षक तुषार दोषी,  अपर अधीक्षक कल्पना बारवकर,  उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप भागवत या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई  पार पडली. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुपे, सपोनी स्वामी, अतुल खंडागळे, विक्रांत घेरडे, विजय पाटील, सचिन घोडे आणि प्रशांत माळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

पर्यावरणाची व सुरक्षिततेची खबरदारी
दारूचा हा साठा नष्ट करताना आजूबाजूच्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली होती. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या यशस्वी कारवाईनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी विश्रामबाग पोलिसांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.