Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अभिजीत दिपकेंनी घेतला CJP आंदोलनातून काही तासांचा ब्रेक, अधिकृत X हँडलवर माहिती

अभिजीत दिपकेंनी घेतला CJP आंदोलनातून काही तासांचा ब्रेक, अधिकृत X हँडलवर माहिती

दिल्ली : खरा पंचनामा 

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिजीत दिपके यांनी आंदोलनातून काही तासांचा ब्रेक घेतला आहे. सातत्याने बिघडणाऱ्या प्रकृतीमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला असून, स्वतः दिपके यांनी आपल्या अधिकृत 'X' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हात आणि सततच्या धावपळीत आंदोलनाचे नेतृत्व करत असताना दिपके यांची प्रकृती खालावली होती. तीव्र ताप आणि अंगदुखीचा त्रास होत असतानाही ते केवळ वेदनाशामक (पेनकिलर्स) औषधे घेऊन आंदोलनात सक्रिय सहभागी होत होते. मात्र, त्रास अधिकच वाढल्याने त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार विश्रांती घेणे भाग पडले आहे.

'गेल्या काही दिवसांपासून मला तीव्र ताप आला असून प्रचंड अंगदुखीचा त्रास होत आहे. तरीही केवळ वेदनाशामक गोळ्या घेऊन मी आतापर्यंत काम पुढे रेटत होतो. आज जर मी जंतरमंतरवर दिसलो नाही, तर त्याबद्दल मनःपूर्वक क्षमा मागतो. मला शरीराला थोडी विश्रांती देणे आणि रिकव्हर होणे अत्यंत गरजेचे आहे. आज सायंकाळपर्यंत मी पुन्हा पूर्ण ताकदीने आंदोलनस्थळी हजर असेन.'

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर आला आहे. अण्णा हजारे यांनीही ही मागणी लावून धरली आहे. गेल्या चार दिवसांपासून जंतर-मंतर येथे देशभरातील असंख्य विद्यार्थी दाखल होत आहेत. मिळेल त्या वाहनाने आंदोलक दिल्लीत पोहोचत आहेत. ज्यांना दिल्लीत जाता येणं शक्य नाहीय, ते आपल्याच शहरात आंदोलन करून राजीनाम्याच्या मागणीला जोर देत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.