Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुमच्या खिशात ५० ग्रॅम ड्रग्स टाकून अन्...; आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांची धमकी?काँग्रेसने 'तो' व्हिडिओ दाखवला

तुमच्या खिशात ५० ग्रॅम ड्रग्स टाकून अन्...; आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांची धमकी?
काँग्रेसने 'तो' व्हिडिओ दाखवला

मुंबई : खरा पंचनामा 

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत तुमच्या खिशात ५० ग्रॅम पावडर (ड्रग्स) टाकून आत टाकू, अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ काँग्रेसने आपल्या अकाऊंटवर शेअर करत सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, किती नीचपणा सुरू आहे, पाहा ! आंदोलनात सहभागी झालात तर "तुमच्या खिशात ५० ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू," अशा धमक्या पोलिसांकडून दिल्या जात असल्याचे आरोप होत आहेत.

'विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाणारी ही दडपशाही लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.', असे देखील त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना गाडीमध्ये बसवले आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये धमकावले जात आहे. पोलिस कर्मचारी म्हणतो आहे की, फिर मेरे जैसा कोई बेकार आदमी नही, वापीस इधर किधर मिला तो 50-50 ग्रॅम पावडर डाल देगा जेब मैं, फिर गया तू, तो जामीन !

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.