Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

FDA ने 3 लोकप्रिय ब्रँडवर घातली बंदी, सौंदर्यप्रसाधनांचा धक्कादायक अहवाल

FDA ने 3 लोकप्रिय ब्रँडवर घातली बंदी, सौंदर्यप्रसाधनांचा धक्कादायक अहवाल

मुंबई : खरा पंचनामा 

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळविक्री तसेच अमली पदार्थांविरोधात कारवाईची मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भेसकयुक्त आणि अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला जात आहे.

तसेच महिलांकडून वापर केल्या जाणाऱ्या ब्युटी क्रीम तसेच स्तनांचा आकार वाढवणाऱ्या प्रोडक्ट्सवर कारवाई केली जात आहे. या कारवाईअंतर्गत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एफडीएने सार्वजनिक आरोग्य इशारा जारी करत ब्युटी क्रीमच्या अनेक कंपन्यांवर कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एफडीए तुकाराम मुंढे यांच्याकडून सौंदर्यप्रसाधनांवर राज्यभरात छापेमारी सुरु असून प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या उत्पादनांमध्ये पारा आणि शिसे यांसारखे विषारी जड धातू आढळले आहेत. हे धातू FDA ने निकृष्ट दर्जाचे घोषित केले आहे. त्यामुळे एफडीएने या उत्पादनांची विक्री, साठवणूक, वितरण आणि वापर तात्काळ थांबवण्याचे तसेच सर्व उत्पादन बाजारातून परत मागवण्याचे निर्देश दिले आहेत.

FDA ने गोरी ब्युटी क्रीम, फेस फ्रेश गोल्ड आणि गोल्डन स्टार ब्युटी क्रीम यांच्या वापराबाबत सार्वजनिक आरोग्य इशारा जारी केला आहे. एका सरकारी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत या उत्पादनांमध्ये पारा आणि शिसे यांसारखे जड धातू वापरले असल्याचे उघड झाले. हे धातू परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात होते, ज्यामुळे मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

त्याचबरोबर कारवाईत या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादन तारीख आणि मुदत समाप्तीची तारीख यांसारखी आवश्यक माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे एफडीएकडून (FDA) ही एक गंभीर अनियमितता असल्याचे मान्य करत अशा उत्पादनांच्या वापरावर आणि विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.

एफडीए विभागाने संबंधित ब्युटी क्रीम्सची विक्री, साठवणूक, प्रदर्शन आणि वितरण तात्काळ थांबवण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच सर्व किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, वितरक आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना ही उत्पादने तात्काळ बाजारातून काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या व्यापाऱ्यांकडे या क्रीम्स आहेत, त्यांनी तात्काळ परत मागवण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि संबंधित एफडीए (FDA) कार्यालयाला कळवावे, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आदेशांचे पालन न केल्यास नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.