Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुकाराम मुंढेंचा दणका! महाराष्ट्रात पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांवर FDA ची मोठी कारवाई90 लाखांचा साठा जप्त; पुणे, नांदेड, बीड, सोलापुरात छापे

तुकाराम मुंढेंचा दणका! महाराष्ट्रात पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांवर FDA ची मोठी कारवाई
90 लाखांचा साठा जप्त; पुणे, नांदेड, बीड, सोलापुरात छापे 

मुंबई : खरा पंचनामा 

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर राबविलेल्या विशेष मोहिमेत पाकिस्ताननिर्मित सौंदर्यप्रसाधने, विनापरवाना तयार केलेली आयुर्वेदिक औषधे, दिशाभूल करणारे दावे करणारी सौंदर्यप्रसाधने आणि रुग्णालयांशी संलग्न औषधांच्या दुकानांतील गंभीर अनियमिततांवर मोठी कारवाई केली.

८ ते १० जुलैदरम्यान नांदेड, पुणे, बीड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे छापासत्र राबवून सुमारे ९० लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयित साठा जप्त करण्यात आला.

नांदेडमध्ये 'अफराह कलेक्शन' येथे पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या 'गोरी ब्युटी क्रीम', 'फेस फ्रेश ब्युटी क्रीम', 'उजोबा एक्स्ट्रा व्हाइट आणि गोल्ड ग्लीम' या सौंदर्यप्रसाधनांचा साठा 'एफडीए'ने जप्त केला. या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील 'कल्पतरू आयुर्वेद' येथे विनापरवाना भस्म व रस औषधांचे उत्पादन आणि विक्री सुरू असल्याचे आढळले आहे. औषधांचे उत्पादन आणि विक्री सुरू असल्याचे आढळले आहे. उत्पादनांवर बॅच क्रमांक, उत्पादन तारीख, मुदत, उत्पादकाचे नाव किंवा परवाना क्रमांक नमूद नसल्याने ५० लाख ३६ हजार रुपयांचा संशयित साठा जप्त करण्यात आला.

बीडमध्ये 'मेरा रूप शृंगार क्रीम' या उत्पादनावर त्वचा उजळण्यासंदर्भातील दिशाभूल करणारे दावे आढळल्याने ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. सोलापूरमधील नोबल रुग्णालयाशी संलग्न औषध दुकानात डॉक्टरांचे 'प्रिस्क्रिप्शन' नसताना औषधविक्री, 'शेड्युल एच' आणि 'एच१' औषधांची नियमबाह्य विक्री, कालबाह्य औषधांचे अयोग्य व्यवस्थापन आणि थंड साखळीतील औषधे बाहेर ठेवणे अशा गंभीर त्रुटी आढळल्याने 'स्टॉप अॅक्टिव्हिटी' आदेश देण्यात आले.

छत्रपती संभाजीनगरमधील कृपामाई रुग्णालयाच्या औषध दुकानामधूनच कर्करोग रुग्णांना औषधे घेण्यास भाग पाडल्याचे उघड झाले. तपासणीत अनेक गंभीर नियमभंग आढळल्याने संबंधित औषध दुकानाचा विक्री परवाना रद्द करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.