Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

Cadilaच्या Aciloc Plus औषधावर FDA ची धडक कारवाई

Cadilaच्या Aciloc Plus औषधावर FDA ची धडक कारवाई

मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्रातील रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) Cadila Pharmaceuticals Ltd. विरोधात मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या "सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे व सुरक्षित महाराष्ट्र" या विशेष मोहिमेअंतर्गत कंपनीच्या Aciloc 150+ आणि Aciloc 300+ या औषधांच्या 2 कोटी 45 लाख 37 हजार 490 रुपयांच्या साठ्याची विक्री व वितरण तातडीने रोखण्यात आली असून संबंधित कंपनीला ही औषधे बाजारातून परत मागविण्याचे (Recall) आदेशही देण्यात आले आहेत.

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत पुणे येथील 89.45 लाख, नागपूर येथील 98.71 लाख आणि भिवंडी (ठाणे) येथील 57.20 लाख किमतीचा औषधसाठा प्रतिबंधित करण्यात आला आहे.

एफडीएच्या नियमित तपासणीदरम्यान अमरावती येथे हे प्रकरण समोर आले. Cadila Pharmaceuticals Ltd., अहमदाबाद या कंपनीला यापूर्वी Aciloc 150 आणि Aciloc 300 या औषधांच्या उत्पादन व विक्रीची परवानगी होती. या औषधांमध्ये Ranitidine हा सक्रिय औषधी घटक (Active Pharmaceutical Ingredient) वापरण्यात येत होता. मात्र, कंपनीने बाजारात आणलेल्या Aciloc 150+ आणि Aciloc 300+ या नव्या औषधांमध्ये Ranitidine ऐवजी Famotidine हा पूर्णपणे वेगळा सक्रिय औषधी घटक वापरल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले. असे असतानाही औषधाच्या नावात केवळ '+' हे चिन्ह जोडून आणि लेबलवरील डिझाइन पूर्वीच्या औषधांप्रमाणेच ठेवण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे, जुनी Ranitidine असलेली Aciloc औषधे आणि Famotidine असलेली नवीन Plus औषधे ही एकाच वेळी बाजारात उपलब्ध होती. त्यामुळे डॉक्टर, औषध विक्रेते आणि रुग्ण यांच्यात संभ्रम निर्माण होऊन चुकीचे औषध दिले जाण्याची शक्यता असल्याचे एफडीएने नमूद केले आहे. एफडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखाद्या ब्रँड नावाखाली विक्री होणाऱ्या औषधातील सक्रिय औषधी घटक किंवा Composition बदलल्यास त्याच ब्रँड नावाने नवीन औषध बाजारात आणणे ग्राह्य धरले जात नाही.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत एफडीएने कंपनीच्या पुणे, नागपूर आणि भिवंडी (ठाणे) येथील मुख्य वितरण केंद्रांमध्ये (CFA) तपासणी केली. त्यानंतर 9 आणि 10 जुलै 2026 रोजी उपलब्ध असलेला 2,45,37,490 किमतीचा संपूर्ण औषधसाठा विक्री व वितरणासाठी प्रतिबंधित करण्यात आला.

एफडीएच्या मते, Deceptively Similar Brand Name मुळे चुकीचे औषध रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण होत असल्याने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाने Cadila Pharmaceuticals Ltd. ला Aciloc 150, Aciloc 150 Plus, Aciloc 300 आणि Aciloc 300 Plus या औषधांचा बाजारातील उपलब्ध साठा तात्काळ परत मागविण्याचे (Recall) आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून तपासाच्या निष्कर्षानुसार औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० तसेच त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

या कारवाईबाबत एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले, "औषधाच्या नावामुळे रुग्ण, डॉक्टर किंवा औषध विक्रेता यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊन चुकीचे औषध दिले जाण्याची शक्यता ही सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. औषधांचे ब्रँड नाव, लेबलिंग आणि विपणन करताना नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. सुरक्षित औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून तो अबाधित ठेवणे ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे."

एफडीएने नागरिक, डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांना औषधांचे बँड नाव आणि सक्रिय औषधी घटक (Active Ingredient)

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.