NEET सारखाच MHT-CET मध्येही महाघोटाळा? 12 वीत 40 टक्के, सीईटीमध्ये 99 पसेंटाईल कसे?
मुंबई : खरा पंचनामा
नीट पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) देशभरात रान उठवले. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आता राज्यात NEET पेक्षाही MHT-CET मध्येही महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव सचिन सावंत यांनी यावर पहिले भाष्य केले. त्यानंतर आमदार रोहित पवार आणि आता राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे यांनी या आरोपांची राळ उठवली आहे. बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया एक्स हँडलवरून शेअर केला आहे. त्यात एका शिक्षकाने एमएच-सीईटी 2026 मध्ये कसा महाघोटाळा झाला याविषयी भाष्य केले आहे. हा व्हिडिओ समोर आणत बालगुडे यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे.
देशात युजी-नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीनंतर विद्यार्थ्यांचा संताप उफाळला. त्याला CJP ने चेहरा दिला. देशभरात या परीक्षा घोटाळ्याविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. जंतरमंतरवर 35 दिवसांहून अधिक काळ आंदोलन लोटले. देशात या आंदोलनाची धग पोहचताच खडबडून जागी झालेल्या मोदी सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. हे आंदोलन अंतिम टप्प्यात असतानाच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्यात मोठा बॉम्ब टाकला. MH-CET परीक्षेत महाघोटाळ्याचा आरोप केला. ज्या विद्यार्थ्यांना बारावीला जेमतेम 35-40 टक्के गुण मिळाले. त्यांना एमएच-सीईटी परीक्षेत 90-100 पर्सेटाईल्स कसे पडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली. त्यांनी या परीक्षेच्या निकालाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यापाठोपाठ आमदार रोहित पवार यांनीही या परीक्षेतील घोटाळ्यावरून सरकारवर निशाणा साधला.
राष्ट्रवादीचे नेत महादेव बालगुडे यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एका शिक्षिकाचा एमएच सीईटीच्या निकालात महाघोटाळा केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये सदर शिक्षकाच्या युट्यूब चॅनलची लिंकही शेअर केली आहे. त्यात या हा घोटाळा कसा करण्यात आला यासंदर्भात कथित आरोप करण्यात आला आहे.
हे स्वतः शिक्षक आहेत. MHT-CET घोटाळा कसा झाला यावर त्यांचा पूर्ण व्हिडीओ खालील लिंकवर बघा. पत्रकार, शिक्षक असे अराजकीय लोक जेव्हा पुराव्यासह बोलतात तेव्हा जनतेचा विश्वास बसतो. तसा तर हा घोटाळा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सर्वात आधी उघडकीस आणला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.