Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अरे 30 वर्षाच्या मुलाला इतके घाबरण्याची गरज नाहीसंजय शिरसाटांच्या भेटीवर अभिजीत दिपके यांनी सोडले मौन..

अरे 30 वर्षाच्या मुलाला इतके घाबरण्याची गरज नाही
संजय शिरसाटांच्या भेटीवर अभिजीत दिपके यांनी सोडले मौन..

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी तूफान चर्चेत आली.

अभिजीत दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेत जे घडले तेच भारतात घडवण्याचा डाव होता, असे सांगितले जातंय. त्यावर आता अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली. यादरम्यान मोहन भागवत यांच्याबद्दलही बोलताना अभिजीत दिपके दिसले. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि बच्चू कडू हे अभिजीत दिपके यांच्या भेटीला गेल्याने राजकारणात मोठा गोंधळ उडाला. भाजपाला हे अजिबात पटले नसून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचे कळतंय.

संजय शिरसाट यांच्या भेटीबद्दल आता अभिजीत दिपके यांनी मोठे विधान केले. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आता 30 वर्षाच्या मुलापासून तुम्हाला एवढी भीती वाटते, याच्यावर मी काय बोलू. ते मला फक्त पर्सनली भेटायला आले होते आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते. दुसरे काहीही नाही. त्यांचे आणि आमचे काहीही बोलणे झाले नाही.

त्यांनी मला फक्त म्हटले की, युवकांचा मुद्दा उचलला, देशाचा मुद्दा उचलला चांगला, असे म्हणून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. मी भाजपाला सांगू इच्छितो की, एवढी घाबरण्याची गरज नाही. ईडी, सीबीआय सगळे तुमच्याकडेच आहे, आमच्याकडे काहीच नाही. आम्हाला लोकं पर्सनली भेटायला येतात आणि शुभेच्छा देतात.

संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतल्याने शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यात तणाव वाढला आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. महायुतीमध्ये अभिजीत दिपकेंच्या भेटीबद्दल निर्णय झाला नसताना तुम्ही कधी भेट घेतली अशी विचारणाही त्यांच्याकडून करण्यात आली. आता त्यावरच अभिजीत दिपके यांनी भाष्य केले. संजय शिरसाट दाखल झाल्यानंतर नक्की काय घडले हे सांगताना दिपके दिसले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.