शरद पवार गटाच्या 8 खासदारांनी पंतप्रधानांकडे केल्या या मागण्या, 20 मिनिटांच्या बैठकीत काय घडलं?
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी (10 ऑगस्ट) भेट घेतली. संसदेच्या पावसाळी अधिवशेनाचा हा शेवटचा आठवडा असल्यामुळे या भेटीबद्दल अनेक चर्चा रंगल्या. संसदेमध्ये डिलीमिटेशन विधेयकदेखील नव्याने सादर केले जाणार असल्याची चर्चा असल्याने या भेटीला अधिक महत्त्व निर्माण झाले होते. या भेटीमध्ये नेमके कोणत्या विषयावर चर्चा झाली हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले.
माध्यमांशी संवाद साधताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांशी 20 मिनिटे चर्चा केली. आमच्या मतदार संघातील मुद्द्यावर आम्ही चर्चा केली. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि फुले पगडी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान केला. कोणतीही राजकीय चर्चा या भेटीत झाली नाही. जे विधेयक आलेले नाही, त्याबद्दल आधीच कयास बांधणे योग्य नाही. आठही लोकसभा मतदार संघातील मुद्दे आम्ही सगळ्यांनी मांडले. या भेटीचा संबध लगेचच एनडीएमध्ये जाण्याबाबत लावू नये." असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
खासदार आमोल कोल्हे म्हणाले की, "नाशिक पुणे रेल्वे आंदोलनाबाबत चर्चा केली. इंद्रायणी मेडिसिटी, चाकण MIDC बाबत चर्चा केली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबतही चर्चा केली." अशी माहिती त्यांनी दिली. "निलेश लंके यांनी आरोग्याबाबत अनेक मुद्दे पंतप्रधान मोदींसमोर मांडले. राजकीयपेक्षा धोरणावर आमची जास्त चर्चा झाली. याआधीही आम्ही त्या त्या मंत्र्यांना भेटलो होतो, पण तोडगा निघत नव्हता म्हणून योग्य ठिकाणी आम्ही मुद्दा मांडला. पंतप्रधान गतिशक्तीचा मुद्दा महत्वाचा आहे, तो मार्गी लागेल हे अपेक्षित आहे." अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या उर्जेचेही कौतुक केले." असेही त्यांनी यावेळी सांगितले. "चाकण MIDC ची अवस्था अत्यंत बिकट असून खड्ड्यांचे साम्राज्य, वाहतूक कोंडी हा अत्यंत मोठा विषय आहे. 59 कोटींचे रस्त्याचे टेंडर निघाले असतानाही खड्डे बुजवले जात नाहीत. मी राज्य सरकारला वारंवार याबाबत पत्र दिली आहेत. या खड्ड्यांमुळे 19 बळी गेले असून याला जबाबदार कोण?" असा सवाल आमदार कोल्हेंनी उपस्थित केला. डिलीमिटेशन विधेयकाबाबत कोणती चर्चा झाली का? असा सवाल उपस्थित करताच खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "आमच्या भेटीचे फोटो एकदा पहा. शिव, शाहू फुलेंच्या विचरांचे प्रतिक आम्ही पंतप्रधान मोदींना दिले आहे. पक्षप्रवेशाच्या विषयावर चर्चा झाली नाही. बिल संदर्भात काही विषय झाला नाही, ते बिल आले नाही. आठही मतदार संघातील प्रश्नासंदर्भात चर्चा झाली. केंद्र सरकार विषयासंदर्भात प्रश्न केंद्रकडे नाही, तर कोणाकडे मांडायचे? पंतप्रधान मोदींनी सर्व मुद्दे समजून घेतले." असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.