ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या?
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या 6 खासदारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. लोकसभा अध्यक्षांनी त्याच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाला दिलेल्या मान्यतेविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 10 ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाने न्यायालयात या विलीनीकरणावर आक्षेप घेतला आहे. केवळ लोकसभेतील खासदारांच्या संख्येच्या आधारे विलीनीकरण करता येणार नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मूळ राजकीय पक्षाची मान्यता, पक्षाची घटना आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया यांचा विचार होणे आवश्यक असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.
या प्रकरणाच्या प्राथमिक सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा सचिवालय आणि संबंधित 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. तसेच या सर्वांना आपली बाजू न्यायालयासमोर मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता 10 ऑगस्टच्या सुनावणीत न्यायालय या विलीनीकरणाला स्थगिती देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.