Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचाराचे 8 गुन्हे; जामिनाला सरकारी पक्षाचा विरोध

अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचाराचे 8 गुन्हे; जामिनाला सरकारी पक्षाचा विरोध

नाशिक : खरा पंचनामा 

भोंदू बाबा अशोक खरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून त्याने लैंगिक अत्याचारातील एका गुन्ह्यात जामिनीसाठी अर्ज केला आहे. मात्र न्यायालयात खरातला जामीन मिळू नये, यासाठी सरकारी पक्षाकडून जोरदार विरोध करण्यात येणार असून जामीन अर्जाला विरोध करताना सरकारी पक्षाकडून सविस्तर युक्तिवाद केला जाणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातविरोधात महिला लैंगिक अत्याचाराचे तब्बल ८ गुन्हे दाखल असून, यापैकी ६ गुन्ह्यांची आरोपपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. तर आणखी दोन गुन्ह्यांची आरोपपत्रे दाखल होणे बाकी आहे. दरम्यान, यातील एका प्रकरणात अशोक खरातच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र, खरातला जामीन मिळू नये, यासाठी सरकारी पक्षाकडून जोरदार विरोध करण्यात येणार आहे. जामीन अर्जाला विरोध करताना सरकारी पक्षाकडून सविस्तर युक्तिवाद केला जाणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.

आरोपीचे वकील कामानिमित्त बाहेर असल्याने आजच्या सुनावणीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे खरातच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी १६ तारखेला होणार आहे. खरातला जामीन का देऊ नये, याबाबत सरकारी पक्षाने आपल्या खुलाशात सविस्तर विवेचन केल्याची माहितीही उज्ज्वल निकम यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.