छत्रपती शिवरायांशेजारी PM मोदींचा फोटो, अमित ठाकरे संतापले, कार्यकर्त्याला म्हणाले, काढ रे तो फोटो!
पुणे : खरा पंचनामा
पुणे दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची पाहणी केली. यावेळी शासकीय महाविद्यालयातील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबीरीशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे दिसल्यानंतर अमित ठाकरे चांगलेच संतापले. 'काढ रे तो फोटो....', असे आदेश त्यांनी कार्यकर्त्याला दिले. कार्यकर्त्याने देखील पुढच्या मिनिटभरात शिवाजी महाराजांशेजारी असलेला पंतप्रधान मोदींचा फोटो काढला.
पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आज मनसेच्या विद्यार्थी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनसे नेते यांनी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कँटीनची पाहणी केली. यावेळी महाविद्यालयातील कारभारावर अमित ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयातील फोटोवरून त्यांनी जोरदार गोंधळ घातला.
दुसरीकडे अमित ठाकरे यांच्या कृतीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप नोंदवला. असे फोटो काढून काही होत नसते. पंतप्रधान मोदी यांनी कोटींच्या हृदयात स्थान मिळवले आहे, त्यांचे स्थान कसे हिरावून घ्याव, असा पलटवार भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.