Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

४५ लाखांची लाच घेतलेल्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं, श्रीनिवास लखमावाडच्या घरातून ACB ला काय काय सापडलं?

४५ लाखांची लाच घेतलेल्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं, 
श्रीनिवास लखमावाडच्या घरातून ACB ला काय काय सापडलं?

नांदेड : खरा पंचनामा 

बीड येथील लाचखोर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड याच्या नांदेड येथील निवासस्थानी एसीबीने झाडाझडती घेतली. त्याच्या नांदेड येथील घरात एसीबीच्या पथकाला एक लाख सात हजार रूपये रोख, तीन तोळे सोने आणि शेत जमिनीची कागदपत्रे आढळली. त्याच्या बँक खात्याचे तपशील मात्र आढळले नाहीत.

बीड जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या निधी वितरणासाठी आणि फाईलवर सही करण्यासाठी तब्बल ४५ लाखांची लाच स्वीकारताना विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवाड याला ३१ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. लखमवाड याच्या नांदेडमधील घरातून एक लाख सात हजार रोख रक्कम, सोने आणि दहा एकर शेतीची कागदपत्रे एसीबीच्या पथकाने जप्त केली. श्रीनिवास लखमावाड हा मूळचा नांदेडचा रहिवाशी आहे.

नांदेड शहरातील आनंद नगर भागात त्याचे वडिलोपार्जित घर आहे. याच घरी काल रात्री नांदेड एसीबीने झाडाझडती घेतली. रात्री अडीच वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. लाच प्रकरणात मोठा अधिकारी अटक झाल्यानंतर, त्यांनी शासकीय नोकरीतून जमवलेली अपसंपदा जप्त करण्यासाठी त्याच्या घरी तपासणी, झाडाझडती घेतली जाते. एसीबीच्या कारवाईची ही प्रक्रिया आहे . त्यानुसार श्रीनिवास लखमावाड याच्या नांदेड येथील निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली, असे नांदेड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राहुल करकसे यांनी सांगितले.

लाचखोर अधिकारी श्रीनिवास लखमावाड हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी हे त्याचे मूळ गाव. मात्र गेल्या २५ ते ३० वर्षापासून त्याचे वडील नांदेड येथे स्थायिक झालेले आहेत. गावाकडे त्यांची शेती आहे. त्याचे वडील निवृत्त बँक अधिकारी आहेत. श्रीवास लखमावाड याचे दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये झालेले आहे. पुढे त्याने बी. टेक इंजीनियरिंग केले. २०१६ साली एमपीएससी परीक्षेत श्रीनिवास लखमावाड हा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून राज्यात प्रथम आला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.