Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत १५ ऑगस्टला 'मराठा समाज उद्योजक मेळावा २०२६' चे आयोजन

सांगलीत १५ ऑगस्टला 'मराठा समाज उद्योजक मेळावा २०२६' चे आयोजन

सांगली : खरा पंचनामा 

मराठा समाजातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व व्यापार वृद्धीला गती देण्यासाठी 'मराठा समाज, सांगली' यांच्या वतीने शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत एस.टी. स्टँड जवळील मराठा समाज भवन, आंबेडकर रोड येथे 'मराठा समाज उद्योजक मेळावा २०२६' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 

या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री मा. आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगलीचे लोकप्रिय खासदार मा. विशालदादा पाटील असणार आहेत.

या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवी दिल्लीतील इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुबीर पॉल हे 'वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट इन मॅन्युफॅक्चरिंग' या विषयावर, तर नाशिकच्या सह्याद्री फार्म्सचे संस्थापक अध्यक्ष मा. विलासराव शिंदे हे 'उद्योजक दृष्टिकोन, उद्योजक समस्या आणि निवारण' या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तरी सांगली व परिसरातील सर्व मराठा उद्योजक, नवउद्योजक आणि व्यावसायिक तरुणांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. मोहन पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय सावंत, सरचिटणीस जयवंत सावंत, खजिनदार ॲड. विलासराव हिरुगडे-पवार व सर्व मराठा समाज कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.