सांगली जिल्हा पोलीस दलातील ४२ अधिकारी व अंमलदारांना महासंचालक पदक जाहीर
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडून अभिनंदन!
एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, किरण चौगले, एपीआय संदीप शिंदे यांचा समावेश
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सन २०२५ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कडून 'अति उत्कृष्ट सेवा पदक' आणि 'उत्कृष्ट सेवा पदक' आज (दि. १४ ऑगस्ट २०२६) जाहीर करण्यात आले आहे.
या पुरस्कारांमुळे सांगली जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून दलाचा सन्मान वाढला आहे. या घवघवीत यशाबद्दल सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सर्व पदकप्राप्त अधिकारी व अंमलदारांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
अति उत्कृष्ट सेवा पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार (एकूण १२) :
पोउपनि चंद्रकांत भीमराव वाघ – मिरज शहर पोलीस ठाणे
सपोफौ तुकाराम तमाण्णा लवटे – मोटार परिवहन विभाग, सांगली
सपोफौ महेश गुलाब जाधव – जिल्हा विशेष शाखा, सांगली
सपोफौ संजय सदाशिव लामदाडे – मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
सपोफौ रत्नकांत आनंदराव पाटणकर – पोलीस मुख्यालय
सपोफौ राजेंद्र भास्करराव पाटील – कासेगाव पोलीस ठाणे
सपोफौ दिलीप नामदेव जाधव – एमआयडीसी कुपवाड पो. ठाणे
सपोफौ प्रशांत वसंतराव मांडके – दहशतवाद विरोधी पथक
सपोफौ निलेश विश्वनाथ कदम – मिरज शहर पोलीस ठाणे
सपोफौ शंकर महादेव पाटील – पोलीस मुख्यालय, सांगली
सपोफौ मेघराज विलास रूपनर – सांगली ग्रामीण पोलीस ठाणे
पोह आनंदराव रंगराव पाटील – विटा पोलीस ठाणे
उत्कृष्ट सेवा पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार (एकूण ३०) :
पोनि किरण वसंतराव चौगुले – मिरज शहर पोलीस ठाणे
पोनि संजीवकुमार दत्तात्रेय झाडे – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
सपोनि संदीप रंगराव शिंदे – महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे
पोह महादेव कांडीबा नागणे – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
पोह सुनील दत्तात्रेय राऊत – वाहतूक शाखा, मिरज
मपोह रूपाली कैलास क्षीरसागर – विश्रामबाग पोलीस ठाणे
पोह समीर बाबलाल सनदी – श्वान पथक, सांगली
पोह दीपक बबनराव ठोंबरे – शिराळा पोलीस ठाणे
पोह सुधीर शंकर गोरे – एमआयडीसी कुपवाड पो. ठाणे
पोह राजाराम महादेव मुळे – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
पोह संदीप भीमराव मोरे – आर्थिक गुन्हे शाखा
पोह संदीप शुक्राचार्य गुरुव – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
पोह अभिजीत मनोहर फडतरे – वाचक शाखा - १
पोह मनोज मोहन निळखंठ – सांगली ग्रामीण पोलीस ठाणे
पोह जावेद मन्सूर मुजावर – सांगली ग्रामीण पोलीस ठाणे
पोह सिकंदर बाबलाल तांबोळी – सांगली शहर पोलीस ठाणे
पोह फारुख लालसाहेब नालबंद – वाहतूक शाखा, मिरज
पोह नागनाथ रामदास कांबळे – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
पोह सागर विठ्ठल लवटे – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
पोह समीर शांतीलाल परदेशी – पोलीस मुख्यालय
पोह मुदस्सर अब्दुलकय्युम पाथरवट – संजयनगर पोलीस ठाणे
मपोह साक्षी सोमनाथ पतंगे – महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे
पोह अरुण जालिंदर पाटील – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
पोह अनिल राजाराम कोळेकर – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
पोह सागर गिरीजापती टिंगरे – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
पोना महेश चंद्रकांत घस्ते – सांगली ग्रामीण पोलीस ठाणे
पोना प्रकाश सूर्यकांत पाटील – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
पोना संदीप शंकर नलावडे – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
पोना उदयसिंह संजयकुमार माळी – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
पोशि स्वप्नील नंदकुमार शिंदे – भिलवडी पोलीस ठाणे
सांगली पोलीस दलातील एकूण ४२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातून आणि पोलीस वर्तुळातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.