Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देशी बनावटीचे पिस्टल अन् २ जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार गजाआडसांगलीत एलसीबीची धडक कारवाई

देशी बनावटीचे पिस्टल अन् २ जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार गजाआड
सांगलीत एलसीबीची धडक कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवैध अग्निशस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवत एका सराईत आरोपीला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मधुसूदन महेश मगदूम (वय २४, रा. हसनी आश्रम, गल्ली नं. ६, विश्रामबाग, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक अवैध शस्त्रांची तपासणी करत होते. तपास सुरू असताना, पोलीस अंमलदार रणजीत जाधव यांना जुना धामणी रोड परिसरात रेकॉर्डवरील आरोपी मधुसूदन मगदूम हा कमरेला पिस्टल खोचून थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने तातडीने जुना धामणी रोड परिसरात सापळा रचला.

संशयित आरोपीला पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्या पँटच्या डाव्या बाजूला १ देशी बनावटीचे पिस्टल आणि उजव्या खिशात २ जिवंत काडतुसे मिळून आली. परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत माळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, रणजीत जाधव, अतुल माने, प्रकाश पाटील, संदीप पाटील, श्रीधर बागडी, अभिजीत माळकर, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, केरुबा चव्हाण, सूरज थोरात, विनायक सनदी आणि सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर यांच्या पथकाने केली.

जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर आणि गुन्हेगारांवर ही कारवाई अशीच सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.