Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत मोबाईल शोरूम अन् दुकाने फोडणारा सराईत चोरटा गजाआड११ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगलीत मोबाईल शोरूम अन् दुकाने फोडणारा सराईत चोरटा गजाआड
११ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : खरा पंचनामा 

शहर व परिसरात मोबाईलची शोरूम्स आणि दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या तीन तासांत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईत आरोपीकडून चोरलेला तब्बल ११ लाख ९ हजार ९८६ रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

चोरट्याने दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ च्या रात्री २९:३० ते ०५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:१५ या वेळेत  बंद दुकाने आणि मोबाईल शोरूम लक्ष्य करून घरफोडी केली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३९(४) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुप्त बातमीदार अन् तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ तपास चक्र फिरवली. तपासादरम्यान पोलीस अंमलदार प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, योगेश पाटील व गणेश बामणे यांना गोपनीय बातमीदाराकडून तसेच तांत्रिक माहितीवरून आरोपीची टीप मिळाली. आरोपी हा माधवनगर परिसरात वावरत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपीच नाव बसवराज परसाप्पा हरिजन (वय २२ वर्षे) मूळ रा.: गडी सोमनाळ, ता. ताळीकोटी, जि. विजापूर (कर्नाटक) असून सध्या रा.: इंद्रप्रस्थ नगर, सांगली असे आहे.

पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवून सखोल चौकशी केली असता, आरोपीने विश्रामबाग आणि सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ४ गुन्ह्यांची कबुली दिली  विश्रामबाग पो. ठाणे (गु.र.नं. २३२/२०२६): फिर्यादी - प्रदीप गजानन देसाई (वय ६४, रा. लक्ष्मीनगर, सांगली), विश्रामबाग पो. ठाणे (गु.र.नं. २३३/२०२६): फिर्यादी - नंदकुमार उत्तम भोसले (वय ३२, रा. पंचमुखी मारुती मंदिराजवळ, सांगली), विश्रामबाग पो. ठाणे (गु.र.नं. २३४/२०२६): फिर्यादी - मनोजकुमार प्रकाश वारे (वय ४५, रा. विजयनगर, माधवनगर), सांगली शहर पो. ठाणे (गु.र.नं. ३२९/२०२६): फिर्यादी - मोहन नारायण वाचाली (वय ५५, रा. खण भाग, सांगली).

११ लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपीने दिलेल्या कबुलीवरून पोलिसांनी पंचनाम्याद्वारे सर्व चोरीस गेलेला ११,०९,९८६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, दिनेश माने, अमर मोहिते, सचिन गायकवाड, बिरोबा नरळे, स्नेहल मोरे, प्रशांत माळी, गणेश बामणे, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, सचिन घोडे यशस्वीरीत्या पार पाडली. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक निलेश बागाव करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.