प्रदेशाध्यक्ष पद अत्यंत महत्वाचं.. प्रशांत किशोरांचा सुनेत्रा पवारांना सल्ला; तटकरेंबाबत चर्चा?
मुंबई : खरा पंचनामा
नुकतेच आमदार झालेल्या प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळं सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अनेक समस्यांना तोडं देत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची होती.
प्रशांत किशोर हे जरी आता आमदार झाले असले तरी ते एक पॉलिटीकल स्ट्रॅटेजिस्ट देखील आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काही मोलाचे सल्ले दिले असून यावेळी जय पवार देखील व्हर्चुअली या बैठकीत सामील होते.
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष पद हे अतिशय महत्वाचे पद असून त्याबाबत काळजी घ्यायला हवी असा सल्ला दिला आहे. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांची काल जवळपास ५ तास बैठक झाली. या बैठकीत जय पवार ऑनलाईन उपस्थिती होते अशी देखील माहिती मिळत आहे.
प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर देखील नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. पक्षात काम करताना प्रदेशाध्यक्षपद महत्वाचं असतं आणि त्याबाबत संवाद हा महत्वाचा असतो. या बैठकीला सुनेत्रा पवार. जय पवार, प्रशांत किशोर आणि त्यांच्या टीममधील दोन सदस्य उपस्थित होते. आता प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानंतर सुनेत्रा पवार प्रदेशाध्यक्षपदाबाबत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.