Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पक्षातील महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा, धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल, विजय चौधरींना अटक

पक्षातील महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा, धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल, विजय चौधरींना अटक

नंदुरबार : खरा पंचनामा 

भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांची काही दिवसांपूर्वीच एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल होताना दिसली. या ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ उडाली. आपल्या पक्षातील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल धक्कादायक भाष्य या ऑडिओ क्लिपमध्ये केले गेले.

हेच नाही तर विजय चौधरी यांच्याकडून शिवीगाळही करण्यात आला. या ऑडिओ क्लिपनंतर खळबळ उडाली. रक्षा खडसे, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याबद्दल काही अपशब्द या ऑडिओ ल्किपमध्ये बोलण्यात आली. विजय चौधरी या ऑडिओ क्लिपमध्ये शिव्या देताना दिसले. मात्र, एकदाही गिरीश महाजन यांनी त्यांना अडकवले नाही किंवा आपल्या पक्षातील एका महिला नेत्याबद्दल ही भाष्य अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले नाही. आता विजय चौधरी हे चांगलेच अडकल्याचे दिसत आहेत.

फक्त रक्षा खडसेच नाही तर डॉ. हिना गावित यांच्याबद्दलची अपशब्द बोलतानाची त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यानंतर नंदुरबारच्या राजकारणात खळबळ उडाली. आता हे प्रकरण थेट पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले. रक्षा खडसे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतरही त्यांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. मात्र, गावित कुटुंबाकडून विजय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजप नेते विजय चौधरी यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली. ही अत्यंत मोठी कारवाई म्हणावी लागणार आहे. डॉ. हिना गावित यांच्याबाबतच्या कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. विजय चौधरी यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाच्या गुन्हा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावाकडून विजय चौधरी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा वैद्यकीय तपासणीनंतर पोलिस कोठडीत विजय चौधरी यांना ठेवण्यात आले. आज न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची होण्याची शक्यता आहे. पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क असून तपास वेगाने सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.