Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई पोलीस दलात वेतन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई : दोघे निलंबित

मुंबई पोलीस दलात वेतन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई : दोघे निलंबित 

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबई पोलीस दलात वेतन घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई झाली आहे. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तत्कालीन प्रमुख लिपिक आरोपी विजया चव्हाण आणि तत्कालीन वरिष्ठ लिपिक अमोल मेम्राम यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दोघांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. समतानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करून आणि कट रचून वेतन घोटाळा केल्याचा आरोप आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघेही 'सेवेतून निलंबित' राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सहपोलीस आयुक्त प्रशासन यांच्याकडून निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पोलीसनसलेल्या व्यक्तींना पोलीस कर्मचारी असल्याचे दाखवून कोट्यवधींचा वेतन घोटाळा केल्याचा आरोप आहे. तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण यांच्यासह इतरांवर गंभीर आरोप आहेत. खोटी वेतन देयके सादर करून शासकीय निधीचा गैरवापर व अपहार केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात शासनाची तब्बल ६ कोटी ४१ लाख १४ हजार ३६ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

प्रमुख लिपिक अजय राठोड व कनिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांचाही प्रकरणात समावेश आहे. संबंधितांविरोधात फसवणूक, अपहार, बनावट कागदपत्रे तयार करणे व पुरावे नष्ट करण्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. भादंवि कलम 409, 420, 406, 467, 465, 471, 201, 120 (ब) व 34 अन्वये कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

2019 आणि 2020 मध्ये हा घोटाळा झाला. 2019 च्या डिसेंबरमध्ये आणि त्यानंतर 2020 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, त्यानंतर जून ते सप्टेंबर 2020 दरम्यानच्या वेतनात हा घोटाळा झाल्याचा संशय आहे. तपासात 2019 ते 2020 मधील वेतन खात्यात तफावत आढळून आली आहे. वेतन व प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासकीय आणि वेतन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा अपहार केल्याचा संशय आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.