Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुपवाड येथील खून प्रकरणातील संशयिताला दोन तासात अटक सांगली एलसीबीची कारवाई

कुपवाड येथील खून प्रकरणातील संशयिताला दोन तासात अटक 
सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

दारात कचरा टाकल्याच्या वादातून दाम्पत्यावर हातोडा, सुरीने हल्ला करून महिलेचा खून करणाऱ्या संशयिताला दोन तासात अटक करण्यात आली. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

फरीद अब्दुल शेख (वय ५२, सध्या रा. विघ्नहर्ता शांती कॉलनी, कुपवाड, मूळ रा. रेणूका मंदीरसमोर, धनगर गल्ली, वानलेसवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी शेख याने कचरा टाकण्याच्या कारणावरून दाम्पत्याशी वाद घालायला सुरुवात केली. नंतर त्याने हातोडा आणि सुरीने दाम्पत्यावर हल्ला केला. यामध्ये मनीषा मोहन केसरेकर (यय ३५) यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर (वय ४५) गंभीर जखमी झाले. त्यानंतर शेख पसार झाला होता.

त्याला पकडण्यासाठी निरीक्षक झाडे यांनी सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते. पथकातील सहायक उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांना शेख हा सांगली मिरज रस्त्यावरील एका इमारतीजवळ थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून त्याला अटक केली. त्याला कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सहायक उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, अतुल माने, सुशिल मस्के, सागर लवटे, संदीप नलावडे, सुनिल जाधव, विनायक सुतार, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.