मंगळवारपर्यंत बदली नाही झाली तर...
अभिजीत दिपके यांचा सरकारला मोठा इशारा
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
दिल्लीतील नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांनी पुन्हा एका सरकारला गंभीर इशारा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात धर्मेद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास कॉकरोच जनता पार्टीसोबत विद्यार्थ्यांनी भाग पाडलं. आता अभिजीत दिपके यांच्या मोर्चा ग्रामीण भागांमधील शाळांकडे वळला आहे. सोशल मीडियावर अभिजीत दिपके यांनी एक पोस्टमधून हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा गावातील एक गंभीर प्रश्न देशासमोर आणलाय.
या सोशल मीडिया पोस्टमधून अभिजीत दिपके यांना सांगितलं की, हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा गावातील ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, शाळेचे मुख्याध्यापक मद्यपान करतात. यासंदर्भातील तक्रार गामस्थांनी वरिष्ठ शिक्षक अधिकाऱ्यांकडेही वारंवार केली. पण अद्याप कुठलेही ठोस कारवाई यासंदर्भात झाली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अभिजीत दिपके यांनी थेट शिक्षण अधिकाऱ्यांना फोन लावून यासंदर्भात जाब विचारला.
यावेळी अभिजीत दिपके यांनी त्यांना इशारा दिला की, मुख्याध्यापकांची मंगळवारपर्यंत बदली झाली नाही किंवा पदावरून हटवलं नाही तर ग्रामस्थांसोबत स्वतः उपोषणाला बसणार, असा थेट इशारा दिला आहे. अभिजीत दिपके यांनी याबद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
यात त्यांनी लिहिलंय की, गावकऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या दारूच्या व्यसनाबद्दल वारंवार तक्रारी केल्या आहेत, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. मंगळवारपर्यंत मुख्याध्यापकांना हटवले नाही, तर मी गावकऱ्यांसोबत आंदोलनात सामील होईन. शाळेत पाच वर्गखोल्यांसाठी फक्त दोन शिक्षक आहेत. या समस्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.