Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पॅलेट गन पीडितासह राहुल गांधी यांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

पॅलेट गन पीडितासह राहुल गांधी यांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

काँग्रेस नेते राहुल गांधी आज संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण कुठवर आलं याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी पोलीस ठाण्यात आले.

यावेळी राहुल गांधी हे पॅलेट गन पीडित साहिल लोहबच यालाही घेऊन पोलीस ठाण्यात गेले. या प्रकरणात अद्याप पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, राहुल गांधी जखमी तरुणासोबत पोलीस ठाण्याबाहेर ठाण मांडून बसले आहेत.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी पॅलेट गनचा वापर करण्यात आला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याची माहिती घेण्यासाठीच राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात आले. जाताना पॅलेट गन पीडित तरुणालाही घेऊन आले. तब्बल अर्धा तास राहुल गांधी पोलीस ठाण्यात होते. यावेळी त्यांनी एफआयआर दाखल करून घेण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐका. त्यांची तक्रार दाखल करून घ्या. एफआयआर दाखल करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी पोलिसांना केली.

पोलिसांकडून पॅलेट गन कारवाईची कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही. त्यामुळे नेमका तपास कुठपर्यंत आलाय हे कळायला मार्ग नसल्याने राहुल गांधी ही माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अर्धा तास पोलीस ठाण्यात राहिल्यानंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राहुल गांधी यांनी थेट पोलिस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. राहुल गांधी यांच्यासोबत पीडित तरुणही ठिय्या आंदोलन करत आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या बाहेरून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी जमली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.