Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

नागपूर : खरा पंचनामा 

पोलीस आयुक्तालयातील अर्ज शाखेत कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षकाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर झोल असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा नाव आहे.

त्यांनी रात्री उशिरा आपल्या शासकीय निवासस्थानी हा टोकाचा निर्णय घेतला. झोल हे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या 'अर्ज' आणि 'प्रोटोकॉल' विभागात कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

पोलीस अधिकाऱ्यासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने पोलीस दलात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोणत्या परिस्थितीमुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले? ते वैयक्तिक, कौटुंबिक किंवा इतर समस्यांशी झुंज देत होते का? सध्या तरी या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळालेली नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आत्महत्येचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले आणि पंचनाम्यासह आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. अधिकाऱ्याच्या मृत्यूशी संबंधित परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले जात आहेत. तसेच, घटनेपूर्वी संबंधित अधिकारी कोणत्या परिस्थितीत होते आणि ते कोणाच्या संपर्कात होते, याचाही पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट (आत्महत्या चिठ्ठी) किंवा अन्य महत्त्वाचा पुरावा सापडला आहे का, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे सविस्तर माहिती दिलेली नाही.

सहाय्यक पोलीस निरीक्षक झोल यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे सहकारी आणि कर्मचारी हादरून गेले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याच्या या घटनेमुळे पोलीस दलातील कामाचा ताण, वैयक्तिक समस्या आणि अधिकाऱ्यांना भेडसावणारा मानसिक तणाव यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. आत्महत्येची कारणे आणि या घटनेशी संबंधित परिस्थिती, तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांवरूनच स्पष्ट होईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.