Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'सर्व गोष्टी एकाच राज्यात कशा जाऊ शकतात?'भाजपा सोडल्यानंतर अन्नामलाईंची मोदी-शाहांवर टीका !

'सर्व गोष्टी एकाच राज्यात कशा जाऊ शकतात?'
भाजपा सोडल्यानंतर अन्नामलाईंची मोदी-शाहांवर टीका !

चेन्नई : खरा पंचनामा 

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत पक्षाला समाधानकारक कामगिरी करता न आल्याने भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर के. अन्नामलाई यांनी नवी राजकीय चळवळ उभी करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी 'वी द लीडर्स' या चळवळीचे राजकीय पक्षात रूपांतर करण्याची घोषणा केली आहे.

इंडिया टुडेच्या 'राउंड टेबल' या विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी “केंद्राने सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे," अशी ठाम भूमिका मांडली. यासोबतच, "दोन गुजराती सर्वोच्च स्थानी आहेत," असे म्हणत त्यांनी देशातील प्रादेशिक अस्मिता आणि केंद्रीय धोरणांमधील असंतुलनावर भाष्य केले.

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने केवळ दिल्लीतून निर्णय घेणे बंद केले पाहिजे, असा सल्ला तमिळनाडू भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि 'वी द लीडर्स' चळवळीचे संस्थापक के. अन्नामलाई यांनी दिला आहे. देशातील सर्व मोठे उद्योग, तंत्रज्ञान प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा केवळ एकाच राज्यात नेण्याच्या 'गुजरात-केंद्रित' विकास मॉडेलवर त्यांनी कडाडून टीका केली आहे.

'इंडिया टुडे तमिळनाडू राउंड टेबल' या परिषदेत बोलताना अन्नामलाई यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर आणि देशातील विकासाच्या असमान वाटपावर उघडपणे नाराजी व्यक्त केली.

भाजपमधील निर्णयप्रक्रिया पूर्णपणे दिल्लीकेंद्रित झाली असल्याचा थेट आरोप अन्नामलाई यांनी केला. "भाजपचे सर्व महत्त्वाचे निर्णय आता दिल्लीतूनच घेतले जात आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही पद्धत आता बदलायलाच हवी," असे ते म्हणाले.

स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीची जाण असलेल्या स्वातंत्र्य मिळायला हवे, अशी आग्रही मागणीही त्यांनी या वेळी केली.

केंद्राच्या विकास धोरणावर प्रश्न उपस्थित करताना अन्नामलाई म्हणाले, "दिल्लीकडून राबवले जाणारे गुजरात-केंद्रित विकास मॉडेल आता बदलावे लागेल. सर्वच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपन्या आणि सेमीकंडक्टर बनवणारे प्रकल्प तिथेच कसे जाऊ शकतात? २०२८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (CWG), ऑल इंडिया पोलीस गेम्स आणि २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजनही अहमदाबादमध्येच केले जाणार का? देशाच्या विकासाचे हे 'गुजरात मॉडेल' असू शकत नाही."

देशातील प्रत्येक राज्याला विकासाची समान संधी मिळणे गरजेचे आहे. सर्व मोठ्या संधी आणि प्रकल्प एकाच राज्यात केंद्रित होत असल्याकडे जनता बारीक लक्ष ठेवून आहे, असा इशाराही त्यांनी दिला. सध्या सेमीकंडक्टर, एआय आणि क्रीडा स्पर्धा आपल्या राज्यात आणण्यासाठी विविध राज्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू असतानाच अन्नामलाई यांनी हे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलताना अन्नामलाई यांनी प्रादेशिक अस्मिता आणि केंद्रीय धोरणांमधील संतुलनावर भाष्य केले होते. "देश एकत्र आणि संघटित ठेवायचा असेल, तर केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान दर्जा आणि संधी दिली पाहिजे," असे ते म्हणाले. देशातील बहुतांश मोठ्या क्रीडा स्पर्धा आणि महत्त्वाचे उपक्रम देशातील बहुतांश मोठ्या क्रीडा स्पर्धा आणि महत्त्वाचे उपक्रम केवळ एकाच ठिकाणी, म्हणजे अहमदाबादमध्ये, आयोजित केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी अशा कार्यक्रमांचे वाटप सर्व राज्यांमध्ये समान पद्धतीने व्हावे, अशी आग्रही भूमिका मांडली.

अन्नामलाई यांच्या या दोन्ही वक्तव्यांमुळे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात तसेच राष्ट्रीय स्तरावर नव्या चर्चांना उधाण आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.