अभिजीत दिपके यांनी थेट मागितला महाराष्ट्रातील या मंत्र्याचा राजीनामा
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून भारतात दाखल होत मोठे आंदोलन उभारले. नीट पेपरफुटीविरोधात त्यांनी हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद देशभरातून मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
अखेर नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा मोदी सरकारसाठी मोठा झटका होता. यादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की, त्यांचा सध्याच राजकारणात जाण्याचा विचार नाही. पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ते आपला लढा सुरू ठेवतील. अभिजित दिपके यांनी आपला मोर्चा जिल्हा परिषद शाळांकडे वळवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शाळेला त्यांनी भेट दिली. मुख्याधापकांच्या बदलीसाठी त्यांनी आग्रह धरला. जर मुख्याध्यापकांची बदली झाली नाही तर उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
आता नुकताच अभिजीत दिपके यांनी म्हटले की, जेवढे मंत्री आहेत, आमदार, खासदार आहेत त्यांनी आपल्या मुलांना एक दिवस खराब रस्त्यावरून पायी शाळेत पाठवले पाहिजे. तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात विद्यार्थ्यांच्या समस्या येतील. आता आम्ही येतोय म्हटल्यावर हे सगळे कामाला लागले, काही आदिवासी मुले मृत्यू पावली.
फक्त रस्ते खराब होते म्हणून, साप चावून मुले गेली.. सरकारच्या अपयशामुळे ही मुले मृत्यू पावली. उजनीच्या या शाळेत देखील साप निघाले आहेत, क्लास रूममधे देखील साप निघत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावले तर या प्रश्नावर भेटू.. गावकऱ्यांनासोबत घेऊन आवाज उठवू आणि तो आवाज मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचेल.
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनाही भेटलो नव्हतो.. भेटण्याची गरज नाही, जे काम व्हायचे होते ते झाले. गावकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसारखे इथे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत, आता ते म्हणतील मागच्या सरकारचे दोष आहे, आम्ही आता निवडून आलो. मात्र, परिस्थिती बदलली नाही. शाळेवर आणखीनही पत्रे आहेत.
मुलांना बसायला बेंच नाहीत. मग तुम्ही दहा वर्षात केले काय? शाळेची अवस्था पाहून मला वाटते की त्यांनी पदावर राहू नये , राजीनामा दिला पाहिजे. शिक्षण मंत्री कोणीही असो त्यांची मुले सरकारी शाळेत पाठवावीत. त्यांना शिक्षण मंत्री पदावर राहायचे असेल तर मुले सरकारी शाळेत पाठवली पाहिजेत. शाळांची हीच परिस्थिती राहिली तर गावागावात आंदोलने उभी राहतील.
नीट पेपर लीक प्रकरणात बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटले की, सीबीआयचा जो तपास सुरू आहे, त्यावर मी समाधानी नाही.. सीबीआय मोठ्या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करते आहे खालचे चार पाच लोक पकडायचे आणि कार्यवाही केली असे दाखवायचे असं सुरू आहे. मोठे अधिकाऱ्यांच्या सहभाग शिवाय नीट पेपर लीक होऊ शकते असे मला वाटत नाही...
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.