आधी पंतप्रधानांनी डिग्री दाखवावीः मग मी माझे कागदपत्रे दाखवेन
वडिलांवरील तक्रारीवरून अभिजित दिपकेंचे खुले आव्हान
दिल्ली : खरा पंचनामा
कॉकरोच जनता पार्टीची पुढील दिशा आणि अजेंडा ठरवण्यासाठी येत्या 5 तारखेला पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली आहे.
आपल्या वडिलांविरोधात झालेल्या तक्रारीवरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला खुले आव्हान दिले आहे.
आगामी बैठकीबाबत माहिती देताना अभिजित दिपके म्हणाले की, आमचा पुढचा अजेंडा ठरवण्यासाठीच आम्ही 5 तारखेला कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. ही बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये माझ्याच घरी पार पडेल. या बैठकीला पक्षाचे प्रवक्ते आणि ज्या कोअर टीम मेंबरनी आम्हाला आंदोलन मॅनेज करण्यात मोठी मदत केली, ते सर्वजण उपस्थित राहतील. सीजेपी'ची चळवळ पुढे कशी घेऊन जायची आणि पक्षाचे संघटन कसे मजबूत करायचे, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाईल.'
अभिजित दिपके यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांच्या कुटुंबाने कसा उचलला? यावरून त्यांच्या वडिलांविरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर आक्रमक प्रतिक्रिया देताना दिपके म्हणाले, मी माझ्या शिक्षणासाठी मिळालेल्या स्कॉलरशिपचे आणि लोनचे कर्जाचे लेटर दाखवायला कधीही तयार आहे. पण माझी एकच अट आहे की, आधी पंतप्रधानांनी त्यांची डिग्री सार्वजनिक करावी. त्यांनी त्यांची डिग्री दाखवली, तर मी माझी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करेन.
सरकारच्या धोरणांवर प्रहार करताना दिपके पुढे म्हणाले की, 'ज्यांना जी काही चौकशी करायची आहे ती त्यांनी खुशाल करावी. देशात सध्या असे वातावरण आहे की, जेव्हा जेव्हा कोणी या सरकारच्या विरोधात बोलते किंवा त्यांना प्रश्न विचारते, तेव्हा हे लोक त्यांचा आवाज दाबण्यासाठी ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणा मागे लावतात. आताही तेच सुरू आहे.'
झारखंडमध्ये नुकत्याच उघडकीस आलेल्या पेपरफुटी प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. 'झारखंडमध्ये पेपर फुटल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांशी माझे बोलणे झाले आहे. मी त्यांना स्पष्ट सांगितले आहे की, जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत अजिबात मागे हटू नका. कॉकरोच जनता पार्टी या लढ्यात पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभी आहे. विद्यार्थ्यांना जी काही मदत लागेल, ती आम्ही नक्की करू, असा विश्वास अभिजित दिपके यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.