Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पाकिस्तानच्या कपटनीतीला भारताचे सडेतोड उत्तर; दिल्लीत पाक उच्चायुक्तालयाबाहेर चालवला बुलडोझर

पाकिस्तानच्या कपटनीतीला भारताचे सडेतोड उत्तर; दिल्लीत पाक उच्चायुक्तालयाबाहेर चालवला बुलडोझर

दिल्ली : खरा पंचनामा 

अमेरिकेच्या स्पष्ट वक्तव्याने पाकिस्तानची कोंडी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक तणाव आता एका अत्यंत नाजूक व गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या प्रशासनाने भारतीय उच्चायुक्तालयाबाबत दाखवलेल्या खोडसाळपणाला आणि चालीरीतींना भारताने तात्काळ आणि कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. नवी दिल्लीतील चाणक्यपुरीस्थित पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर प्रशासनाने मोठी कारवाई करत बाह्य सुरक्षा परिघातील बॅरिकेड्स, ट्रॅफिक बोलार्ड्स आणि शेडचे अनधिकृत बांधकाम बुलडोझरच्या साहाय्याने हटवून टाकले आहे. भारताच्या या थेट आणि आक्रमक 'जशास तसे' कारवाईमुळे पाकिस्तानच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पाकिस्तान प्रशासनाने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षेसाठी लावलेले पार्किंग खांब आणि तात्पुरते अडथळे अचानक हटवले होते. पाकिस्तानच्या या उथळ आणि चिथावणीखोर पावलाचा अंदाज घेताच, भारतीय यंत्रणांनीही दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाचा बाह्य सुरक्षा घेरा कमी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली पोलिसांनी आणि महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने व्हिसा विभागाच्या बाहेर रस्त्यावर आलेले सुरक्षा अडथळे आणि रांगेसाठी बनवलेले शेड जमीनदोस्त केले. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांचा विचार करता ही केवळ एक प्रशासकीय कारवाई नसून, भारताने दिलेला स्पष्ट कूटनैतिक संदेश मानला जात आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील या तणावाची मुळे ही सीमापार दहशतवादाशी जोडलेली आहेत. पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांना थेट लक्ष्य करत 'ऑपरेशन सिंदूर' राबवले होते. या लष्करी कारवाईनंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्यात आली असून, व्हिसा सेवा आणि इतर सुविधांवर आधीच अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

या सर्व घडामोडींच्या मागे आणखी एक अत्यंत महत्त्वाची राजनैतिक पार्श्वभूमी आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत आणि दक्षिण-मध्य आशियाचे विशेष प्रतिनिधी सर्जिओ गोर यांनी नुकताच जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला. गेल्या सहा वर्षांत काश्मीरला भेट देणारे ते पहिले उच्चपदस्थ अमेरिकी अधिकारी ठरले आहेत. श्रीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची भेट घेतल्यानंतर सर्जिओ गोर यांनी, 'जम्मू-काश्मीर हा भारताचा एक अत्यंत सुंदर आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे,' असे स्पष्ट आणि अनधिसृत विधान केले.

अमेरिकेच्या या वक्तव्यामुळे आणि काश्मीरमधील सुधारलेल्या सुरक्षेच्या कौतुकामुळे इस्लामाबाद प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. चिडलेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्याला बोलावून अधिकृत निषेध नोंदवला. मात्र, अमेरिकेच्या या ठाम भूमिकेने आणि भारताच्या आक्रमक 'जशास तसे' धोरणाने पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थान अधिकच कमकुवत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.