Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'यावेळी भांगेत कुंकू अन् सलवार घालून आंदोलन करू नका'

'यावेळी भांगेत कुंकू अन् सलवार घालून आंदोलन करू नका'

गोंडा : खरा पंचनामा 

भाजपाचे नेते, माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बाबा रामदेव यांनी 'स्वदेशी'च्या मुद्द्यावर सुरू केलेली मोहीम आता बनावट उत्पादने आणि विदेशी वस्तूंपर्यंत पोहोचली आहे, असा आरोप त्यांनी केला.

गोंडा जिल्ह्यातील एका महाविद्यालयात शुक्रवारी २१ ऑगस्टला आयोजित कार्यक्रमात बोलताना सिंह यांनी रामदेव यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. रामदेव यांनी सुरुवातीला 'स्वदेशी'चा मुद्दा पुढे करत आंदोलन केले होते आणि त्यावेळी त्यांची भूमिका योग्य होती, असे सिंह म्हणाले. मात्र, आता ते 'विदेशी' अंतर्वस्त्रांचे उत्पादनही करत असल्याची टीका त्यांनी केली.

बाबा रामदेव यांना आंदोलन सुरू करण्याचे आव्हान देत ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, जर त्यांना पुन्हा कोणत्याही मुद्द्यावरून आंदोलन करायचे असेल, तर त्यांनी यावेळी निर्णायक लढा द्यावा. बाबा रामदेव यांच्या पूर्वीच्या आंदोलनांची आठवण करून देत सिंह म्हणाले की, "बाबा रामदेव यांनी आंदोलन सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हो, पण अट एवढीच की, यावेळी त्यांना सिंदूर, टिकली आणि सलवार परिधान करून येऊ नये", असे त्यांना सांगितले पाहिजे. त्यांनी रामदेव यांना एका "पुरुषाप्रमाणे" आंदोलन करण्याचे आणि निर्णायक लढा देण्याचे आवाहन केले.

देशात बनावट तुपाच्या विक्रीबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत असल्याचेही ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटले. या प्रकरणासाठी त्यांनी रामदेव यांना जबाबदार धरल्याचा दावा केला.

दरम्यान, सिंह यांच्या वक्तव्यामुळे रामदेव यांच्या 'स्वदेशी' मोहिमेवरून भाजपामधीलच एका नेत्याने केलेली टीका चर्चेत आली आहे. बाबा रामदेव यांनी अद्याप या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

ब्रिजभूषण शरण सिंह आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्यात २०२२ पासून वाद सुरु आहे. भाजपाच्या ब्रिजभूषण सिंह यांनी त्यावेळी बाबा रामदेव आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांना त्यांच्या ब्रँडसाठी 'पतंजली' हे नाव न वापरण्याची मागणी केली होती. सिंह यांचा मूळ जिल्हा असलेल्या गोंडा येथील महर्षी पतंजली यांच्या जन्मस्थानासाठी त्यांनी "काहीही" केले नाही, असा आरोप त्यांनी केला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.