Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सदानंद दाते, देवेन भारती यांच्यासह मुंबईतील अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदके

सदानंद दाते, देवेन भारती यांच्यासह मुंबईतील अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदके

मुंबई : खरा पंचनामा 

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार यंदा पहिल्यांदाच राज्य पोलिस दलातील तब्बल १९४९ अधिकारी, अंमलदारांची पोलीस महासंचालकांच्या उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट सेवा पदकांसाठी निवड करण्यात आली आहे.

राज्याच्या गृहविभागाने पदक विजेत्यांची यादी जारी केली असून यामध्ये राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच महासंचालक संजय वर्मा, रितेश कुमार, संजीव सिंघल, अर्चना त्यागी, प्रभात कुमार, प्रशांत बुरडे यांच्यासह विविध महत्त्वपूर्ण पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह गृहविभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग, म्हाडाचे मुख्य दक्षता अधिकारी विनीत अग्रवाल, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद, दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख नवल बजाज, महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक प्रवीण साळुंके तसेच डॉ. निखिल गुप्ता (कायदा व सुव्यवस्था), मधुकर पांडे (प्रशासन), डॉ. रवींद्र सिंगल (लाचलुचपत विभाग), राजकुमार व्हटकर (राज्य राखीव पोलीस दल) आणि कृष्ण प्रकाश (प्रशिक्षण व विशेष पथके ) आदी अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा समावेश आहे.

याशिवाय सुप्रिया यादव-पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, अशोक मोराळे, निसार तांबोळी, डॉ. महेश पाटील, एन. डी. रेड्डी, रामनाथ पोकळे, विनायक देशमुख, संजय जाधव, डी. के. साकोरे, पंजाबराव उगले, दत्ता शिंदे, एस. व्ही. पाठक या १३ पोलिस महानिरीक्षकांना अतिउत्कृष सेवा पदक जाहीर झाले आहे. प्रवीण पाटील, शहाजी उमप, विक्रम देशमाने, धनंजय कुलकर्णी, राजेंद्र दाभाडे, संजय शिंत्रे, मनोज पाटील आदी १३ उपमहानिरीक्षक, एकमेव पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, ६८ उपअधीक्षक, १०८ पोलिस निरीक्षक, चार सहाय्यक पोलिस निरीक्षक, ८८ पोलिस उपनिरीक्षक, २३० सहाय्यक उपनिरीक्षक आणि २११ अंमलदारांची अति उत्कृष्ट सेवा पदकासाठी निवड झाली आहे तर अन्य अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदकाने गौरविण्यात येणार आहे.

राष्ट्रपतींकडून शौर्य पदके गडचिरोलीचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजू गवळी, वासुदेव मडवी तसेच पोलीस नाईक दिलीप अत्राम, दशरथ मढवी, हेड कॉन्स्टेबल विजय कोढापे, कॉन्स्टेबल अजय मढवी, गणेश दुब्बुला, विजय मढवी, भुपेश भूमनाके, दल्सू बोगामी, राजेश किरांगे, मासा अत्राम, राकेश बोडकी, सुधाकर पोरटेट, श्रीनिवास निश्तुरी, नितेश टेंबेकर, गणेश गंजिवार, शिवाजी हिचामी आणि संजय कंकाबंदावार यांना राष्ट्रपतींच्या शौर्य पदके जाहीर झाली आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.