विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दुसऱ्यांदा मोठं यश; केंद्रानंतर झारखंड सरकारही झुकलं, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची महत्त्वपूर्ण घोषणा
रांची : खरा पंचनामा
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. तसेच TSR Data Processing Private Limited (TDPL) या कंपनीशी संबंधित सर्व कामकाज, त्यात कंपनीने घेतलेल्या परीक्षा, प्रसिद्ध केलेले निकाल आणि निवड झालेल्या उमेदवारांशी संबंधित प्रक्रियाही रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांच्या विरोधात विद्यार्थ्यांचे गेल्या 24 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं.
झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथील जयपाल सिंह स्टेडियम येथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सोमवारी (ता.17) रात्री माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सोरेन म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाने JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी ही एक मागणी होती.
हेमंत सोरेन यांनी "TDPLशी संबंधित सर्व काही रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी यावेळी टीडीपीएल कंपनीने घेतलेल्या परीक्षा, जाहीर केलेले निकाल, निवड झालेले उमेदवार, परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार तसेच TDPLने केलेल्या इतर सर्व कामकाजाचा समावेश आहे."
मुख्यमंत्र्यांनी 2014 पासून आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व भरती परीक्षांमधील गैरप्रकारांची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेशही दिले. ते म्हणाले, "2014 पासून झालेल्या छोट्या-मोठ्या सर्व त्रुटींची सखोल चौकशी केली जाईल. केंद्र सरकारने MMDR कायद्यात केलेल्या सुधारणांवर चर्चा करण्यासाठी आम्ही लवकरच बैठक घेऊ. गरज भासल्यास या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशनही बोलावले जाऊ शकते."
विशेष तपास पथक (SIT) आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) तपासातून अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत, असंही सोरेन यांनी सांगितलं. ते म्हणाले, "तपास सुरू असल्याने प्रत्येक माहिती उघडपणे सांगणे शक्य नाही. मात्र, CGL प्रक्रियेतून नियुक्त झालेल्या काही व्यक्तींना JPSC परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित आरोपांवरून अटक करण्यात आल्याचे आढळून आले आहे. याशिवाय, वेगवेगळ्या काळात झारखंडमध्ये कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांचे एकमेकांशी जोडलेले गुंतागुंतीचे नेटवर्क असल्याचेही दिसून आल्याचंही सोरेन यांनी म्हटलं.
सोरेन यांनी यावेळी 2014 पासून आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांचा सखोल तपास करण्याचे निर्देश सरकारने संबंधित विभाग आणि CIDला दिल्याचेही सोरेन यांनी सांगितले. या निर्णयाचं विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसेच सोरेन, राज्य प्रशासन, पोलीस, माध्यमे, विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभारही मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.