शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे यांना मोठा झटका? सुप्रिम कोर्टाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी टिप्पणी
नवी दिल्ली : खरा पंचनामा
मोठी बातमी समोर येत आहे, शिनसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीमकोर्टात सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे सुप्रीमकोर्टात शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे.
दरम्यान हा युक्तिवाद सुरू असतानाच आता सुप्रीम कोर्टाकडून मोठी टिप्पणी करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या संगटनात्मक गोष्टी मांडत आहात, त्या बरोबर वाटत आहेत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणावर आता सुप्रीम कोर्टाकडून मोठी टिप्पणी करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. यावेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. यावेळी बोलताना कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. 1999 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुखपद नव्हत, हे यांना 2026 ला कळालं का? असा सवाल यावेळी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक आयोगाला त्यांच्या सोईनुसार निर्णय घ्यायचा होता असा आरोप देखील यावेळी सिब्बल यांनी केला आहे. तसेच पक्षात आधी फूट पडल्याचं स्पष्ट नव्हत मग तक्रारी कशा करायच्या? असा सवालही यावेळी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान यावर आता सुप्रीम कोर्टाककडून मोठी टिप्पणी करण्यात आली आहे. तुम्ही ज्या संगटनात्मक गोष्टी मांडत आहात, त्या बरोबर वाटत आहेत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.