विजय यांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडली अन् मंत्र्यांच्या जागेवर बसले ! विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं...
चेन्नई : खरा पंचनामा
विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश मिळवत सत्ता काबीज केल्यानंतर विजय यांची मुख्यमंत्री म्हणूनही लोकप्रियता वाढत चालली आहे. त्यांनी सत्तेत आल्यापासून घेतलेले निर्णय, तसेच त्यांची लोकांमधील त्यांचा वापर, संवादाची पध्दत... यामुळे ते सतत चर्चेत असतात. आता विधानसभेतील त्यांच्या एका कृतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
तामिळनाडू विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था आहे. विधानसभा अध्यक्षांच्या समोरील बाजूस उजव्या हाताला पहिले आसन मुख्यमंत्र्यांचे आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आसनाच्या डाव्या बाजूला थोडे अंतर सोडून मंत्र्यांची आसने आहेत. विधानसभेच्या परंपरेनुसार मुख्यमंत्री विधानसभेत आल्यानंतर अध्यक्षांशेजारील आसनावरच बसतात. पण विजय यांनी ही परंपरा गुरूवारी मोडली.
विधानसभेचे दुसऱ्या सत्राचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री विजय सभागृहात आले अन् आपला आसनावर बसले. मात्र, काहीवेळाने ते तिथून उठून शेजारील मंत्र्यांच्या आसनावर जाऊन बसले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. मुख्यमंत्री कधीही आपले आसन सोडून इतरत्र बसत नाही. विजय यांनी मात्र मंत्र्यांशेजारी जाऊन बसत नवा पायंडा पाडल्याची चर्चा आहे.
विजय हे मंत्री के. ए. सेंगोटियन यांच्या शेजारी जाऊन बसले होते. त्यांच्याशी चर्चा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दुसरे मंत्री अढाव अर्जुना हेही मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विधानसभेत दोन मंत्र्यांच्या मध्ये बसून चर्चा करणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिल्याच चर्चा तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात रंगली होती.
विधानसभेत आमदार किंवा मंत्री आपले आसन सोडून इतरांच्या आसनावर जाऊन बसतात. हे दृश्य विधानसभेसह लोकसभेतही दिसते. पण मुख्यमंत्री कधीच आपले आसन सोडत नाहीत. विजय यांनी ही परंपरा मोडित काढल्याची चर्चा आहे. सभागृहामध्ये सरकारकडील बाजूला प्रोटोकॉल, पद, ज्येष्ठतेनुसार आसनव्यवस्था केली जाते. त्यांच्या विरुध्द दिशेला विरोधी पक्षाचे सदस्य असतात. तिथेच विशिष्ट निकषानुसार आसनव्यवस्था असते. विरोधी पक्षनेत्यांसाठी निश्चित आसन असते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.