विधानसभेतील पराभवानंतरही ममतादीदींचा करिष्मा कायम; बार कौन्सिलच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा
कोलकाता : खरा पंचनामा
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवनानंतर पहिला दिलासा मिळाला आहे. विधानसभेनंतर राज्यात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. या निवडणुकीत भाजपसह इतर पक्षांचा धुव्वा उडाला आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना वारंवार राजकीय झटके बसत आहे. अनेक आमदार, खासदारांनी साथ सोडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ताही त्यांच्या हातून जात आहे. या नामुष्कीनंतर ममतादीदींना पश्चिम बंगाल बार कौन्सिलच्या निवडणुकीत मोठा विजय मिळाला आहे. कौन्सिलच्या २३ पैकी १५ जागांवर तृणमूल काँग्रेस समर्थित उमेदवारांचा विजय झाला आहे.
बार कौन्सिलमध्ये टीएमसीचा दबदबा कायम असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. तृणमूल काँग्रेससमोर राज्यात पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपचा दारुण पराभव झाला असून पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. तर डाव्या पक्षांना तीन आणि काँग्रेसलाही दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.
ममता बॅनर्जी यांच्या शिफारशीवरून तृणमूल समर्थित २३ उमेदवारांपैकी १५ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामध्ये चार महिला वकिलांचा समावेश आहे. निवडणुकीत एकूण ७५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी टीएमसीचे २३, भाजपचे २२, डाव्या पक्षांचे १२ आणि १८ अपक्ष उमेदवार होते. टीएमसी लॉयर्स सेलचे सदस्य माजी खासदार शुभाशीष चक्रवर्ती हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहे.
निवडणुकीबाबत टीएमसी लॉयर्स सेलचे सदस्य संजय वर्धन यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालयांमध्ये वकिली करत असलेल्या सदस्यांच्या मतदानातून बार कौन्सिलची निवडणूक पार पडली. लवकरच टीएमसीकडून नवे मंडळ नियुक्त केले जाईल. दरम्यान, तृणमूल काँग्रेसला मिळालेला हा विजय ममता जाईल. दरम्यान, तृणमूल काँग्रेसला मिळालेला हा विजय ममता बॅनर्जी यांच्या गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.