Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'क्रिकेटर्सना नॉन-व्हेज चहा पाजत होतात का?' हायकोर्टाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला झापलं !

'क्रिकेटर्सना नॉन-व्हेज चहा पाजत होतात का?' हायकोर्टाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला झापलं !

मुंबई : खरा पंचनामा 

क्रिकेटच्या दुनियेतून एक धक्कादायक आणि तितकीच विचित्र बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) कॅन्टीनमधील अस्वच्छतेबद्दल ऐकून मुंबई उच्च न्यायालय चांगलेच संतापले.

किचनमध्ये झुरळं आणि माश्यांचा सुळसुळाट पाहून, 'खेळाडूंना आपण 'नॉन-व्हेज चहा' पितोय याची कल्पना होती का?' असा उपरोधिक प्रश्न कोर्टाने विचारला आहे.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पाच रेस्टॉरंट्सचा परवाना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) नुकताच निलंबित केला होता. एफडीएच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता, झुरळांचा वावर आणि निसरडी जमीन आढळली होती. या कारवाईविरोधात MCA ने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सुनावणीदरम्यान, MCA च्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितले
देऊ शकत नाही." यावर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने एफडीएच्या अहवालाचा हवाला देत सणसणीत टोला लगावला. ते म्हणाले, "एफडीएच्या रिपोर्टनुसार तिथे झुरळं आणि माश्या आहेत. मग अशा परिस्थितीत, खेळाडूंना आपण 'नॉन-व्हेज चहा' (Non-Veg Tea) पित आहोत हे माहीत होते का?"

- किचनमधील जमीन अत्यंत घाणेरडी आणि निसरडी होती.

- अन्न सुरक्षेच्या नियमांना पूर्णपणे केराची टोपली दाखवण्यात आली होती.

न्यायालयाने MCA ला कठोर शब्दांत फटकारले आहे. गुरुवारी एफडीए अधिकारी पुन्हा तपासणी करण्यापूर्वी कॅन्टीनचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वच्छतेचे निकष न पाळल्यास परवाना रद्द करण्याचा अधिकार एफडीएला आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सध्या सोशल मीडियावर हायकोर्टाची ही 'नॉन-व्हेज चहा' वाली टिप्पणी प्रचंड व्हायरल होत असून, क्रिकेट चाहते MCA विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.