शरद पवार यांच्या भेटीनंतर पार्थ पवार आक्रमक, नेत्यांची तातडीची बैठक बोलावली
मुंबई : खरा पंचनामा
दोन दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्य आणि केंद्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
या भेटीनंतर पार्थ पवार अधिकच आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांना भेटल्यानंतर पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत बैठकांचा झपाटा लावला आहे. काल रात्री राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर पार्थ यांची आता पुन्हा एकदा नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार हे गुलदस्त्यात आहे. पार्थ पवार यांनी लागोपाठ दोन दिवस बैठक घेतल्याने राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय? अशी चर्चा रंगली आहे.
पार्थ पवार यांनी काल शुक्रवारी रात्री मोजक्या मंत्र्यासोबत बैठक केली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. राज्यातील राजकीय परिस्थिती, केंद्रातील मंत्रीपद आणि राज्यातील विकास कामे आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मंत्र्यांच्या खात्यात येणाऱ्या अडचणीवरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पार्थ पवार यांच्या वरळी येथील निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मंत्री नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, छगन भुजबळ, इंद्रनील नाईक उपस्थित होते.
कालच्या बैठकीनंतर आज दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोअर कमिटीची बैठक सुरू झाली आहे. पार्थ पवार यांच्या वरळी येथील शुभदा निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नवाब मलिक, मंत्री नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, छगन भुजबळ, इंद्रनील नाईक उपस्थित आहेत. गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू आहे. या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत.
दोन दिवसांपूर्वीच पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. सिल्व्हर ओक येथे जाऊन सुमारे तीन तास त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली होती. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता. त्यानंतर पार्थ पवार यांनी अचानक पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीत काय घडतंय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.