मंत्रालयातील बैठकीच्या आश्वासनानंतर आदिवासी विद्यार्थ्यांचा 'लाँग मार्च' स्थगित ! ; यवतमाळात आंदोलन सुरूच
यवतमाळ : खरा पंचनामा
अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत प्रलंबित मागण्या, पेसा व गैरपेसा नोकरी भरती आणि शासकीय वसतिगृहातील सोयी-सुविधांच्या प्रश्नांवरून आक्रमक झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शनिवारी दखलपात्र वळण मिळाले.
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानाकडे अमरावतीहून निघालेला 'लाँग मार्च' बाभूळगाव येथे मुक्कामी असताना, १ सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीचे अधिकृत पत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन पायी मोर्चा तूर्तास स्थगित केला. मात्र, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक अनिर्णित राहिल्याने यवतमाळच्या विद्यार्थ्यांनी आपले बेमुदत आंदोलन अकराव्या दिवशीही सुरूच ठेवले आहे.
शुक्रवारी अमरावतीहून निघालेला हा पायी मोर्चा रात्री बाभूळगाव येथे पोहोचला असता प्रशासकीय पातळीवर हालचाली वेगाने घडल्या. अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी देवगाव येथे आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या न्याय्य हक्कांना पूर्ण पाठिंबा दर्शवला व प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव येथे हा मोर्चा पोचल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत या विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी तातडीने बाभुळगाव येथे पोहचून पहाटे ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांनी यवतमाळ येथील आंदोलन अकराव्या दिवशीही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
मंत्रालयातील बैठकीचे निमंत्रण मिळाले असले तरी, विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. 'मंत्रालयातील बैठकीत जर आमच्या सर्व प्रलंबित मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही, तर हे आंदोलन थांबणार नाही; उलट अधिक तीव्र स्वरूपात पुन्हा छेडले जाईल,' अशी आक्रमक भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आज शनिवारी वर्षा निवासस्थानी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करत, त्यांच्या पूर्ततेसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आदिवासी समाजाच्या विकासासोबतच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याची भूमिका मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.