Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ASI पी. एन. पाटील यांनी संपवलं आयुष्य, वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून उचललं टोकाचं पाऊल

ASI पी. एन. पाटील यांनी संपवलं आयुष्य, वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून उचललं टोकाचं पाऊल 

नवी मुंबई : खरा पंचनामा 

नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील रबाळे परिसरात ASI पी. एन. पाटील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ASI पी.एन. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगितली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलीस दलातील ASI पी. एन. पाटील यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या आधी सुसाईड नोट मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं लिहिली आहे. तसंच त्यांनी एक व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड करून ठेवला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

यामध्ये त्यांनी माझ्या आत्महत्येस तत्कालीन DCP संजय कुमार पाटील, वायरलेस ACP गिरीष ठाकरे, सध्या आस्थापना विभागातील हेड कॉन्स्टेबल जयवंत आहीरे यांनी मला त्रास दिला आहे, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. त्याच बरोबर पी.एन. पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आहेत. ऐरोली मधील लॉजवर जावून फॅनला गळफास घेवून आत्महत्या करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी न्याय द्यावा, जय हिंद महाराष्ट्र पोलीस, जय महाराष्ट्र पोलीस, असं म्हणत पाटील यांनी अखेरचा निरोप घेतला.

घटनास्थळी मिळालेल्या कथित सुसाईड नोटमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्यामुळे खळबळ उडाली आहे. पाटील यांनी एक ८ पानाची नोट सुद्धा लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये नेमके काय आरोप करण्यात आले आहेत, याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.