Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"बेकायदेशीर न्यायालयाचा निर्णय अमान्य"सिंधू जल करारावरून हेग लवादाचा निर्णय भारताने फेटाळला

"बेकायदेशीर न्यायालयाचा निर्णय अमान्य"
सिंधू जल करारावरून हेग लवादाचा निर्णय भारताने फेटाळला

दिल्ली : खरा पंचनामा 

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगित केलेला सिंधू जल करार अद्याप लागूच आहे. अलिकडेच या पाणी वाटप कराराबाबत हेगस्थित स्थायी लवाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भारताने कराराच्या स्थगितीचा निर्णय कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. भारताने नाकारले आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. भारताने यापूर्वी देखील या बेकायदेशीर संस्थेचे निर्णय नाकारले आहेत, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले.

सिंधू नदीच्या पश्चिमेकडील नद्यांवरील भारताच्या किशनगंगा आणि राटले जलविद्युत प्रकल्पांच्या रचनेसंदर्भातील मतभेदांवरून पाकिस्तानने लवादाकडे दाद मागितली होती.

पाकिस्तान स्थायी लवाद न्यायालयात गेल्यापासूनच भारताने त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. हा वाद तांत्रिक बाबींशी निगडीत असून करारत नमूद केल्याप्रमाणे संबंधित क्षेत्रातील निःपक्ष तज्ज्ञांनी याची पडताळणी करावी, अशी भूमिका सुरवातीपासूनच भारताने घेतली आहे. पण, तरी देखील लवादाला या विषयाची पडताळणी करण्याची परवानगी देणे करारात नमूद वाद सोडविण्याच्या तरतुदीच्या विरोधात जाण्यासारखे आहे, असेही भारताने नमूद केले. हेग मधील या स्थायी लवादाकडे दाद मागण्यासाठी भारत कधीच गेला नाही असे स्पष्ट करताना लावदाने यापूर्वी दिलेल्या निर्णयांचे देखील खंडन केल्याचे म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.