Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

श्रीमंतीचा माज ! मोबाईलवर बोलत उडवलं, ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, प्रकरण दाबण्यासाठी साक्षीदाराला पैशांची ऑफर

श्रीमंतीचा माज ! मोबाईलवर बोलत उडवलं, ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, प्रकरण दाबण्यासाठी साक्षीदाराला पैशांची ऑफर

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईतील वांद्रे परिसरात एका महिला कारचालकाने फोनवर बोलत भरधाव वेगात कार चालवत असताना एका आठ वर्षांच्या लहान मुलाला चिरडल्याची घटना घडली. रविवारी झालेल्या या घटनेत अंश गुप्ता (वय ८) याचा मृत्यू झाला असून तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

अंशाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला पकडताच आरोपीकडून साक्षीदाराला पैशांची ऑफर दिल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात जॉन बाप्टिस्ट रोडवर रविवार (ता. ३१ ऑगस्ट) रोजी भीषण अपघात घडला. आरोपी महिला मेघा रावल फिटनेस कोच आणि न्युट्रिशनिस्ट असून ती मोबाइलवर बोलत भरधाव वेगात कार नेत होती. फोनवर बोलायचं नादात महिलेने रस्ता ओलांडणाऱ्या अंश गुप्ता या ८ वर्षीय मुलाला जोरदार धडक दिली.

या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून या अपघातप्रकरणी वांद्रे पोलिसांनी मेघा रावल हिच्यावर कलम 105, 281, 125 भारतीय न्याय संहिता (BNS) सहकलम 184 मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी मेघा रावल हिच्या कुटुंबीयांनी साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

वांद्रे येथे घडलेल्या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यामध्ये प्रत्यक्षदर्शी असलेल्या संदीप सिंह यांना मेघा रावलच्या कुटुंबीयांनी जबाब बदलण्याची ऑफर दिली आहे. संपूर्ण प्रकरणात संदीप सिंह यांना गप्प राहण्यासाठी आरोपीच्या परिवाराकडून आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप संदीप सिंह यांनी केला आहे.

वांद्रे येथे घडलेल्या अपघातात अंश गुप्ताच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. अंश एकुलता एक मुलगा असून 15 वर्षांनी गुप्ता कुटुंबीयांच्या घरी पाळणा हलला होता. तसेच 2 सप्टेंबरला अंशचा वाढदिवस होता. मात्र त्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिसरातून एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.