Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिलेच्या तक्रारीवरून आमदार संजय गायकवाड यांच्यावर बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल

महिलेच्या तक्रारीवरून आमदार संजय गायकवाड यांच्यावर बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल

बुलढाणा : खरा पंचनामा 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा वाढदिवस मित्रपरिवाराने बुलढाणा शहरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी एक रॅली काढण्यात आली होती. त्या रॅलीत 'बाप तो बाप रहेगा....' अशा प्रकारे गाणेही वाजवण्यात आले होते. या गाण्यावर प्रसारमाध्यमांनी आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली असता संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, 'बाप तो बाप है हे ठीक आहे. मात्र हे विधान एखाद्या पुरुषाने केलं तर चालेल, मात्र एखाद्या बाईने म्हटलं बाप तो बाप आहे तर बापाचं शरीर आणणार कुठून....?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. हे विधान समाज माध्यमात व प्रसार माध्यमात मोठ्या प्रमाणात विधान समाज माध्यमात व प्रसार माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं.

दरम्यान, या विधानावर महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचला असून महिलांच्या शरीर ठेवणीवर प्रहार करण्यात आला, असा आरोप करत संजय गायकवाड यांनी हे विधान हेतू पुरस्कर केल्याची तक्रार करत एका 42 वर्षीय महिलेने आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रारदिलीआहे. या तक्रारीवरून मध्यरात्री आ. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेमुळेबुलढाणाजिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आणि भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर श्वेता महाले यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं नाव न घेता टोला लगावला होता.

यावर आमदार संजय गायकवाड यांनीही प्रत्युत्तर देत टीका केली होती. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवाने रॅली काढून वाढदिवस साजरा केला, याचं मला फार वाईट वाटलं. मला फाईट करता, तर तुम्ही माझ्याशी विकासाची फाईट करा. मी जर एखाद्या शेतकऱ्याला मदत केली तर तुम्हीही मदत द्या. वाढदिवसाला खर्च केल्यापेक्षा एखादे गरीबाला मदत करा. आम्ही अशी उधळपट्टी कधी करत नाही. आमचेही वाढदिवस होतात, पण आम्ही एव्हढे कधी खर्च करत नाही. बाप तो बाप रहेगा, हे माणसाने बोललं तर बरं आहे. एखाद्या बाईने म्हटले की मी बाप आहे तर बापासारखे शरीर कुठून आणणार आहे. हे शोभते का बोलायला. मग राजकारणातला बाप कोण आहे हे योग्यवेळी आम्ही दाखवून देऊ, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांना दिला होता. अशातच या वक्तव्याप्रकरणी आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.